Skip to product information
1 of 1

झपाटलेला शिलेदार (Zapatlela Shiledar)

झपाटलेला शिलेदार (Zapatlela Shiledar)

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : झपाटलेला शिलेदार - सर्वान्तीस : जीवन व कार्य (Zapatlela Shiledar : Cervantes - Jivan Va Karya)

Author : विजय पाडळकर (Vijay Padalkar)

Publisher : वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)

Language : मराठी (Marathi)

Pages : 300

मिगेल द सर्वान्तीस या लेखकाची डॉन किहोते ही जगातील पहिली आधुनिक कादंबरी. या कादंबरीने साहित्य, कला, नाट्य, सिनेमा आणि जागतिक विचारविश्वाला विलक्षण प्रभावित केले आहे. झपाटलेला शिलेदार हे पुस्तक सर्वान्तीसच्या जीवनाचा, त्याच्या साहित्यिक प्रवासाचा आणि डॉन किहोतेच्या निर्मितीमागील प्रेरणांचा शोध घेतं. ही केवळ एका कादंबरीची वा तिच्या लेखकाची कथा नाही, तर फ्योदोर दस्तयवस्की, गुस्ताव फ्लॉबेर, जी. ए. कुलकर्णी यांसारख्या महान साहित्यिकांपासून ते आजच्या सलमान रश्दीपर्यंत; तसेच पाब्लो पिकासो, साल्वादोर दाली यांसारख्या दिग्गज कलाकारांना प्रभावित करणाऱ्या महान कादंबरीचा प्रदीर्घ आढावा घेणारा दस्तऐवज आहे. डॉन किहोते हे केवळ वाङमयीन पात्र नाही, तर माणसाच्या अंतर्मनातील स्वप्नं, भ्रम आणि संघर्षांचं प्रतीक आहे अशी मांडणी करणारं हे पुस्तक साहित्यप्रेमींसाठी आणि डॉन किहोतेच्या झपाटून टाकणाऱ्या विश्वाचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अनोखी पर्वणी आहे. एका झपाटलेल्या लेखकाने केलेल्या 'डॉन किहोते' या महाकादंबरीच्या पाठलागाची कहाणी सांगणारं मराठीतील आगळंवेगळं पुस्तक.

View full details