Skip to product information
1 of 1

निळ्या पहाडाच्या मुलाखती (Nilya Pahadachya Mulakhati)

निळ्या पहाडाच्या मुलाखती (Nilya Pahadachya Mulakhati)

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 210.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : निळ्या पहाडाच्या मुलाखती (Nilya Pahadachya Mulakhati)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 172

शरणकुमार लिबाळे यांचा 'अक्करमाशी' ते 'सनातन' असा लेखनप्रवास बहुविध स्वरूपाचा आहे. त्यांच्या साहित्यातील जातजाणिवा, इतिहासाची जाण, पर्यायी सौर्दशास्त्र, दलित शैलीविचार आणि वर्तमानाच्या बहुमुखी भानामुळे लिंबाळे यांना भारतीय पातळीवर लेखक म्हणून मान्यता मिळाली, लेखक, विचारवंत आणि समीक्षक असणाऱ्या लिवाळे यांच्या या मुलाखतीमधून, त्यांच्या वाड्मयविचारविश्वाबरोबर भाषांतरविद्या व आजच्या सांस्कृतिक पर्यावरणावरील भाष्य आहे. भाषांतरव्यवहार व भाषांतर परकाया प्रवेशामुळे त्यांना देश-विदेशात मान्यता मिळाली. या त्यांच्या साहित्याच्या भाषांतराविषयीच्या अनुभवांनी या मुलाखतींना वेगळेपणा प्राप्त झाला आहे. तसेच या मुलाखतींचा एक मुख्य भाग हा 'सरस्वती सन्मान' प्राप्त 'सनातन' या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीविषयी आहे. तो प्रतिसाद व प्रतिवादाच्या स्वरूपाच आहे. याबरोबरच त्यांच्या या मुलाखती चितनात आंबेडकरी चळवळीची वाटचाल, तिचे यशापयश व मर्यादांवर भाष्य आहे. दलित पँथरच्या सामर्थ्यस्थानाच्या व आंबेडकरी प्रेरणेच्या विश्वासनोंदी आहेत. तसेच दलित साहित्यातील अंतर्विरोधांवर भाष्य आहे. हे सर्व त्यांच्या मनातील सहज वाहतेपणाच्या आस्थेपोटी प्रकटले आहे.

लिबाळे यांच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'काल'च्या नॉस्टॉल्जियामध्ये फारसे रमत नाहीत. समाज, इतिहास आणि वाङ्मयाचा ते आजच्या संदर्भात विचार करतात. प्रस्थापितांचा मौनाचा प्रदेश आणि अस्मितांच्या छावण्यांतील टोकाच्या आग्रह पार्श्वभूमी ते समाज आणि सांस्कृतिक व्यवहाराकडे चिकित्सेच्या अंगाने पाहतात. तसेच त्यांना दडप काळातील विचारवंतांच्या खुनांनी अस्वस्थ केले आहे. लिंबाळे यांच्या मुलाखतीतील परखड असे वाग्बाण हिंदुत्ववाद्यांना जसे झोंबणारे आहेत, तसेच आंबेडकरवाद्यांनादेखील. याबरोबरच या मुलाखतीत जागतिकीकरण काळाविषयी व त्यांच्या वाङ्मयीन प्रवासाच्या खुणा आहेत. चौफेर चितनाला महत्त्व असणाऱ्या मुलाखतीसारख्या प्रकारातून लिबाळे यांच्या विचारांचा मुक्त चितनाविष्कार आहे. लिंबाळे यांच्या या चितनसुरात चिकित्सक वस्तुनिष्ठता आहे, तसाच प्रामाणिक परखडपणाही. त्यांच्या विचारांत नव्या काळाचे व नव्या जीवनाचे स्वागत आहे. समाज आणि साहित्याच्या संदर्भात त्यांना जातशोषणमुक्ती, समता व माणुसकीचा स्वर महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे इतिहासाची जाणीव शबलित होत असलेल्या समकाळात, लिंबाळे यांचा निळ्या पहाडातील हा चितनप्रदेश अधिक महत्त्वाचा आणि मौलिक ठरतो. - प्रा. रणधीर शिंदे

View full details