Skip to product information
1 of 1

मास्टर ऑफ द गेम (Master Of The Game)

मास्टर ऑफ द गेम (Master Of The Game)

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : मास्टर ऑफ द गेम (Master Of The Game)

Author : सिडने शेल्डन (Sidney Sheldon)

Translator : विजय देवधर (Vijay Deodhar)

Publisher : श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)

Language : मराठी (Marathi)

Pages : 636

"कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला त्यात प्राविण्य मिळवायला हवं, 'मास्टर ऑफ द गेम' बनायला हवं !" केट ब्लॅकवेलचं हे ब्रीदवाक्य होतं.
'कूगर-ब्रेट लिमिटेड' या जगभर पसरलेल्या एका अफाट उद्योगसमूहाची ती मालकीण होती. एक अत्यंत श्रीमंत नि जगप्रसिद्ध स्त्री! तिचं सबंध आयुष्य हे हजारो अनुत्तरित प्रश्नांनी वेढलेलं एक गूढ कोडं होतं...! हिऱ्यांच्या शोधात निघालेला तिचा बाप एक स्वप्नाळू तरुण होता. स्वप्नातदेखील कल्पना करता येणार नाही इतकी संपत्ती त्यानं मिळवली...! तिची आई एका धूर्त नि कपटी आफ्रिकन व्यापाऱ्याची मुलगी होती...!! खुद्ध केटचा जन्म तिरस्कारापोटी उगवल्या गेलेल्या सुडातून झाला होता..!!!! तिच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भव्य आनंदोत्सवात जगभरातली प्रतिष्ठित मंडळी हजर होती. सुप्रीम कोर्टाच्या एका जञ्जनं तिच्याबद्दल गौरवपर भाषण केलं !
व्हाइट हाऊसमधून खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांकडून तिला अभिष्टचिंतनाची तार आली !! हयात नसलेल्या काही मित्रांची, शत्रूची नि नातेवाईकांची काही भुतंसुद्धा तिच्या वाढदिवसाला आली होती...!! कपट, फसवणूक, दगलबाजी आणि खून यांनी भरलेला केटचा आयुष्यप्रवास अतिशय खडतर असाच होता. तिनं काय मिळवायचं ठरवलं होतं? आणि प्रत्यक्षात तिला काय मिळालं? 'मास्टर ऑफ द गेम' जगभर 'बेस्ट सेलर' म्हणून गाजलेली सिडने शेल्डन यांची आणखी एक अजोड कलाकृती.
अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि निग्रही अशा स्त्रीच्या आयुष्याची ही दैदिप्यमान कहाणी आपल्या समर्थ लेखणीतून मराठीत तितक्याच प्रभावीपणे उतरवली आहे आमचे वाचकप्रिय लेखक आणि अनुवादित साहित्याच्या क्षेत्रातले 'मास्टर ऑफ द गेम' श्री. विजय देवधर यांनी ! श्रीराम बुक एजन्सीतर्फे रसिक वाचकांना एक अत्यंत अविस्मरणीय नि हृदयस्पर्शी भेट!

View full details