घर (Ghar)
घर (Ghar)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.
Couldn't load pickup availability
Book Name : घर (Ghar)
Author : युडिथ हेरमान (Judith Hermann)
Translator : सुनंदा विद्यासागर महाजन (Sunanda Vidyasagar Mahajan)
Publisher : वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)
Language : मराठी (Marathi)
Pages : 178
घर या कादंबरीत लेखिका एक मध्यमवयीन, मध्यमवर्गीय स्त्रीची गोष्ट सांगते. ती आपलं आयुष्य सोडून नव्याच्या शोधात समुद्रकिनाऱ्यावरच्या एका लहानशा गावात येऊन राहते. अजून जुने आयुष्य पुरते सुटले नाही, जुनी नाती मनातून पुरती पुसली जात नाहीत. नवीन नाती तयार करताना ती सावध आहे. ती करताना आपली भावनिक गुंतवणूक कितपत होत आहे याचा अंदाज तिला येत नाही. थोडक्यात, जुने मागे टाकले आहे आणि नवीन आयुष्य जरासे आकाराला येत आहे या टप्प्यावर ती येऊन पोचली आहे. या नवीन गावीच आपले घर आहे का? हे गाव आपल्याला आपले वाटत आहे का? शहरी-निमशहरी वातावरणाच्या ऐवजी हा समुद्राचा निकट सहवास आपल्याला झेपत आहे का? अशा अनेक प्रश्नांसहित ती नवीन ठिकाणी जगण्यासाठी चाचपडत आहे. ही कादंबरी आपल्याला, म्हणजे मराठी वाचकाला, तेथील समाजात जगण्याच्या किती निराळ्या पद्धती असू शकतात, जगण्यात किती निराळे, आपण कल्पनाही करू शकणार नाही असे बारकावे असू शकतात याकडे लक्ष वेधते.
Share
