Skip to product information
1 of 1

फॅरनहाईट ४५१ (Fahrenheit 451)

फॅरनहाईट ४५१ (Fahrenheit 451)

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above.

Book Name : फॅरनहाईट ४५१ (Fahrenheit 451)

Author : रे ब्रॅडबरी (Ray Bradbury) 

Translator : माया पंडित (Maya Pandit)

Publisher : वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)

Language : मराठी (Marathi)

Pages : 203

फॅरेनहाईट ४५१ ही अमेरिकन इंग्रजी वाङ्मयातील एक अजरामर कादंबरी आहे. भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भयावह जगाचं भाकीत करणारी ही विलक्षण कथा आपल्याला अक्षरश: झपाटून टाकते. ही कादंबरी जगाचा 'वाङ्मयोत्तर' भविष्यकाळ आपल्यासमोर साक्षात उभा करते. 'फॅरेनहाईट ४५१' ही कादंबरी जॉर्ज ऑरवेलच्या '१९८४' आणि आल्डस हक्सलेच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' यांच्या तोडीची आहे. माध्यमं, नशिली ड्रग्ज आणि समाजातील प्रस्थापित समज यांच्या विखारी प्रभावांचा गुलाम झालेल्या पाश्चात्त्य जगाचं चित्र ती आपल्यासमोर रंगवते. रे ब्रॅडबरीची भाषा समर्थ गद्य नि काव्यात्मक पद्य यांचा अद्भुत संयोग साधते. तंत्रज्ञानाच्या विकासक्षमतांचा नकाशा मांडून त्यात दडलेल्या शक्यतांचा ती मर्मभेदी वेध घेते. या कादंबरीच्या प्रकाशनाला आता ५० वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या धक्कादायक नि स्तिमित करणाऱ्या मांडणीमुळे तिची वाचकांवरची मोहिनी अद्यापही कायम आहे.

View full details