डेझर्टर (Deserter) + सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)
डेझर्टर (Deserter) + सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)
Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.
Couldn't load pickup availability
Book Name : डेझर्टर (Deserter)
Author : गंथर बान्हमान (Gunther Bahnemann)
Translator : विजय देवधर (Vijay Devdhar)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 366
Book Name : सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)
Author : जे. एम. बॉअर (J.M. Bauer)
Translator : वसुधा माने (Vasudha Mane)
Publisher : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
Language : मराठी (Marathi)
Pages : 198
डेझर्टर (Deserter)
गंथर बान्हमान यांच्या ‘आय डेझर्टेड रोमेल’ या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे. हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे. रोमेल २१व्या पँझर डिव्हिजन मधून निसटले. सहारा वाळवंटाचा वालुकामय प्रदेश ओलांडून त्यांना आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचायचे होते. सुमारे तीन हजार मैलांचा हा खडतर प्रवास गंथर यांनी सुरु केला. आणि अनेक थरारक प्रसंगाना ते सामोरे गेले. अनेक प्राणघातक संकटे त्यांच्यावर कोसळली. त्यातूनही ते निसटत गेले. ते कसे हे पुस्तकातच वाचणे योग्य…
सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)
'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे.
ही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन सजा काराग्रहात भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून, विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!
त्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी! या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!
दुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना, या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती नाहक बळी गेले, हे सांगणारी ही कहाणी!
या प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली. दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!
या साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी ! सैबेरियातून पलायन!
Share
