Skip to product information
1 of 1

दंगल (Dangal)

दंगल (Dangal)

Regular price Rs. 98.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 98.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : दंगल (Dangal)

Author : शरणकुमार लिंबाळे (Sharankumar Limbale)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 124

फुले आंबेडकर ह्यांच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान घेऊन सातत्याने प्रयोगशील साहित्यनिर्मिती करणारे शरणकुमार लिंबाळे हे दलित साहित्याची क्षितिजे विस्तारत नेणारे महत्त्वाचे परिवर्तनवादी लेखक आहेत. त्यांचे व्यापक समाजनिरीक्षण आणि सूक्ष्म आत्मविश्लेषक दृष्टी ह्यामुळे त्यांच्या साहित्याला मिळणारी परिमाणे मराठी साहित्यक्षेत्राबाहेरची मान्यता मिळवून देणारी ठरली आहेत.

'दंगल' ह्या लघुकादंबरीत त्यांनी दलित पँथरचा जन्म व विकासक्रम ह्यांचा एक जिवंत आलेखच सादर केला आहे. दलित चळवळीवरची ही कृत्ती अनन्यसाधारण अशी आहे कारण ह्या सर्व प्रक्रियेत लेखक स्वतः सक्रिय होता. पापणी जागी ठेवून लिहिलेली ही कहाणी आहे.

'परपुरुष' ह्या लघुकादंबरीत शरणकुमार लिंबाळे, सामाजिक व प्रशासकीय संस्थांमधील व्यवस्थेचे आणि त्यामध्ये संसर्गजन्य रोगासारख्या पसरणाऱ्या भ्रष्टाचाराचे वास्तववादी चित्रण करताना पुन्हा आपल्या अनुभवाचं सृजनशील रूपांतर करतात.

ह्या दोन्ही लघु कादंबऱ्यांची प्रत्ययपूर्ण भाषा, सजीव चित्रण, पात्रांची अंतर्बाह्य ओळख, त्यांचे परस्पर संवाद-विसंवाद आणि लेखकाची निर्भीड परखड शैली ह्यातून वाचकाला समग्रपणे समकालीन परिस्थितीचे भान आल्याशिवाय रहाणार नाही. -निशिकांत ठकार

View full details