Skip to product information
1 of 1

समन्वय : शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखती (Samanvay : Sharankumar Limbale Hyanchya Mulakhati)

समन्वय : शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखती (Samanvay : Sharankumar Limbale Hyanchya Mulakhati)

Regular price Rs. 262.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 262.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

Shipping : Flat ₹60 for orders up to ₹999 & FREE for orders of ₹999 & above selected state.

Book Name : समन्वय : शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखती (Samanvay : Sharankumar Limbale Hyanchya Mulakhati)

Author : संपादक - डॉ. विजयकुमार खंदारे (Dr. Vijaykumar Khandare)

Publisher : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)

Language : मराठी (Marathi)

Pages : 247

जातींच्या उच्च-नीच स्तरांवर उभारलेल्या समाजाची खरी खुरी वेदना काय असते ते फक्त तळचा माणूसच सांगू शकतो. कारण त्याने ते अनुभवलेले असते. म्हणून त्याचे समाज, संस्कृती आणि धर्मावरचे भाष्य अस्सल मानवतेला आवाहन करणारे असते. असे मानवतेला आवाहन करणारे लेखक म्हणजे शरणकुमार लिंबाळे हे होत.

गेल्या अर्धशतकापासून निष्ठेने लेखन करणाऱ्या शरणकुमार लिंबाळे यांना जन्मापासूनच उपेक्षा, दारिद्र्य आणि दुःखाशी सामना करावा लागलेला आहे. आजही ते उपेक्षेचा सामना करीत आहेत. उपेक्षेने आणि संघर्षाने वेढलेल्या या लेखकाला भारतीय धर्म आणि संस्कृतीचे अंतरंग नेमकेपणाने कळले आहे. किंबहुना हेच त्यांचे सामर्थ्य आहे. त्यांचा आणखी एक विशेष असा की, ते सरळ ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देतात. अशा या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या लेखकाच्या मुलाखतींचे संपादन डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले आहे, ही अतिशय स्वागतार्ह घटना आहे. 

डॉ. विजयकुमार खंदारे, हे साहित्याचे जाणकार आणि साक्षेपी अभ्यासक आहेत. शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. 

या मुलाखती मराठी समाज आणि संस्कृतीला अंतर्मुख करतील अशी मला खात्री आहे. -डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

View full details