उसबा (Usaba)
उसबा (Usaba)
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : उसबा (Usaba)
थरार एका ज़िहादी टोळीच्या खात्म्याचा!
लेखक : दिनेश कानजी (Dinesh Kanji)
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
परवेज मुसा... इंडियन मुजाहिदीन खतरनाक दहशतवादी. नेपाळमध्ये जाळे टाकून आयबीने त्याला जेरबंद केले.
एनआयएच्या अज्ञात सेफ हाऊसमध्ये तपास अधिकारी त्याला अहोरात्र प्रश्न विचारत होते.
तो एकेक सनसनाटी गौप्यस्फोट करीत होता. इंडियन मुजाहिदीनचे देशभर पसरलेले जाळे, देशभरात झालेले बॉम्बस्फोट, आयएसआय, अल कायदाचे धक्कादायक तपशील, जगभरातील दहशतवाद्यांशी असलेले त्यांचे संबंध. कोणतेही आढेवेढे न घेता तो सर्व काही सांगत होता; पण तरीही... डीसीपी रामसिंह नेगी अस्वस्थ होते. काही तरी सुटले आहे असे त्यांना सारखे वाटत होते. दोन महिन्यांनंतर मुसाने दडवलेले ते रहस्य कानठळ्या वाजवणाऱ्या स्फोटांसह उघड झाले. भारताच्या राजकारणात उलथापालथ घडवणारा तो धक्कादायक कट... काय होते ते कारस्थान? मुसाच्या अटकेनंतर कोण बनला त्या कटाचा सूत्रधार? आयबी, एनआयए आणि एटीएसशी सुरू असलेल्या शह काटशहांच्या चुरशीच्या शर्यतीत कोणी कोणाला मात दिली?
Share

