Skip to product information
1 of 2

सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)

सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)

मूळ लेखक : जे. एम. बॉअर (J.M. Bauer)

अनुवाद : वसुधा माने (Vasudha Mane)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे.
ही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन सजा काराग्रहात भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून, विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!
त्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी! या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!
दुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना, या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती नाहक बळी गेले, हे सांगणारी ही कहाणी!
या प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली. दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!
या साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी ! सैबेरियातून पलायन!

View full details