कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)
कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव : कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)
लेखक : निरंजन घाटे (Niranjan Ghate)
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)
स्त्रियांच्या पराक्रमाची वर्णनं फार प्राचीन काळापासून वाचायला मिळतात. चाणक्यानं स्त्री-गुप्तहेरांपासून चंद्रगुप्ताला सावध राहावयाचा खणखणीत इशारा दिलाच; पण विषकन्यांपासूनही वाचवलं. स्त्रीच्या मोहात पडलेल्या पुरुषाच्या तोंडून कोणतंही गुपित वदवून घेता येतं, म्हणून स्त्रियांचा फार पूर्वीपासून हेरगिरीसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. स्त्रिया फक्त हेरगिरीच करत आल्या आहेत असं नाही, तर त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूला पाणी पाजल्याची अनेक उदाहरणं दुसऱ्या महायुद्धात घडलेली आहेत. पुरुषांच्या पराक्रमावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, मात्र स्त्रियांच्या पराक्रमावर त्यामानानं कमी पुस्तकं लिहिली गेली. माताहारी ही स्त्री गुप्तहेर म्हणून गाजली खरी, पण दुसऱ्या महायुद्धानं अनेक माताहारींना जन्म दिला. ह्या पुस्तकामध्ये साहसवीरपराक्रमी अशा महिला आहेत; आणि स्त्री गुप्तहेरही आहेत. युद्ध जिंकायला त्यांनी हातभार लावला यात शंका नाही. स्त्रियांच्या पराक्रमाच्या या कथा वाचकांना आवडतील असा मला विश्वास वाटतो. - निरंजन घाटे
Share

