Skip to product information
1 of 2

दास्तान-ए-नौशाद (Dastan-E-Naushad)

दास्तान-ए-नौशाद (Dastan-E-Naushad)

Regular price Rs. 378.00
Regular price Rs. 420.00 Sale price Rs. 378.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : दास्तान-ए-नौशाद (Dastan-E-Naushad)

लेखक : शशिकांत किणीकर (Shashikant Kinikar)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

साठ वर्षांहूनही अधिक काळ मी सिनेमालाईनमध्ये आहे. चित्रपट संगीताची मी माझ्या कुवतीप्रमाणे थोडीफार सेवा केली. माझ्या चाहत्यांनी मला वेळोवेळी बहुमान बहाल केले, त्यामुळंच आज मी ‘संगीतकार नौशाद’ म्हणून ओळखला जातो. माझ्या संगीतातल्या राग-रागिण्यांचे आरोह-अवरोह माझ्या चाहत्यांना परिचित आहेत, हा मी माझा गौरव समजतो. माझ्या संगीत जीवनातले चांगले वाईट क्षण, सुखदु:खांचे अवसर यांचे आरोह-अवरोहही माझ्या चाहत्यांना माहीत व्हावेत म्हणून आज माझ्या जीवनाची तर्ज मी पहिल्यांदाच रसिकांपुढे ठेवत आहे. मला माझं जीवनचरित्र सांगत बसायचं नाही; पण एक कलाकार म्हणून मी केलेली कलेची सेवा रसिकांपुढं मांडायची आहे. अर्थात हे करत असताना माझ्या व्यक्तिगत जीवनाचे पडसाद त्यामध्ये ताल देत राहाणार याचीही मला जाणीव आहे, पण मला वाटतं ती गोष्टही अटळच नाही का? - नौशाद (मनोगतातून) 

View full details