Skip to product information
1 of 2

बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)

बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Quantity

पुस्तकाचे नाव : बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)

लेखक : डॉ. दिलीप देवधर (Dr. Dilip Devdhar)

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)

बदलत्या जीवनमानानुसार आपला आहार बदलला आहे. व्यायामाचा अभाव, सुखवस्तू जीवन, व्यसन, मानसिक ताणतणाव वाढत आहेत. यामुळे 'जीवनशैलीमुले उद्भवणाऱ्या आजारांचे' प्रमाण सातत्याने वाढत आहे. ब्लडप्रेशर, डायबेटीस, हृदयविकार, संधिवात, स्पाँडेलेसिस, पचनाच्या तक्रारी मध्यमवयीन तक्रारी मध्यमवयीन व्यक्तींबरोबरच तरुणांमध्येही आहे. आधुनिक जीवनशैली आरोग्याची कशी हानी करीत आहे आणि टाळून आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे हे डॉ. दिलीप देवधर यांनी 'बदलती जीवनशैली आणि आजार 'मधून सांगितले आहे. बदलती जीवनशैली म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केले आहे. रक्तदाबाची व्याख्या, कार्य रक्तदाबात होणारे बदल, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारे धोके, तपासण्या, आहार, व्यायाम सांगितले आहे. त्याचप्रमाणे मधुमेह (डायबेटीस ), हृदयरोग, हाडांचे व सांध्यांचे आजार, पोटाचे विकार व पचनाच्या तक्रारी या आजारांविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. जीवनशैली व व्यसने, मानसिक ताण व मनोविकार, जीवनशैली व व्यायाम, जीवनशैली व आहार यांचे महत्त्वही सांगितले आहे. मेनोपॉज काळ, त्याची लक्षणे, त्याचा परिणाम, घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली आहे.

View full details