{"product_id":"smrutisthal","title":"स्मृतीस्थळ (Smrutisthal)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e स्मृतीस्थळ (Smrutisthal)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eडॉ. रमेश आवलगावकर\u003c\/span\u003e \u003cspan\u003e(Dr. Ramesh Avalgavkar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी सारस्वतात लीळाचरित्रानंतर स्मृतिस्थळाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रीनागदेवाचार्य हे या ग्रंथातील नायक. स्मृतिस्थळातील बहुतांश आठवणी त्यांच्या भोवती गुंफलेल्या आहेत. स्मृतिस्थळ श्रीनागदेवाचार्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध म्हटला तरी चालेल. कारण लीळाचरित्रात त्यांच्या आयुष्याचा श्रीचक्रधरस्वामींच्या सन्निधानात पूर्वार्ध आलेला आहे. अवताराच्या लीळा लिहिण्याचे कार्य म्हाइंभटांनी केले व ते करणे पंथीयांच्या दृष्टीने योग्यही होते. मात्र श्रीनागदेवाचार्यांच्या समकालीन व पुढील पिढ्यांनी त्यांच्या व नंतरच्या काही थोर थोर पंडितांच्या आठवणीही वृद्धाचार, मार्गरूढी, वर्तमान इत्यादी प्रकारांतून लिहिण्याचे कार्य केले, हे पंथीयांच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे ठरले, तेवढेच तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक इतिहास समजून घेणाऱ्या अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे ठरले. 'स्मृतिस्थळा' चे महत्त्व ऐतिहासिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन दृष्टींनी निश्चितच मोलाचे आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेले ‘स्मृतिस्थळा' चे पाठ हे अपूर्ण होते. डॉ. रमेश आवलगावकर यांनी आपल्या साक्षेपी संशोधनातून सिद्ध केलेला - 'स्मृतिस्थळा' चा बृहपाठ हा एक अपूर्व शोध आहे. मराठी भाषा, मराठी वाङ्मयाचा इतिहास व महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास यांच्या अभ्यासकांना व संशोधकांना हा ग्रंथ निश्चितच मोलाचा वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712917389401,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/smrutisthal-1.jpg?v=1793634680","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/smrutisthal","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}