{"product_id":"bhaykatha-d-p-khambete","title":"भयकथा (Bhaykatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eभयकथा (Bhaykatha)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे (D. P. Khambete)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eखांबेटे यांच्या भयकथांचे एक ठळक वैशिष्ट्य असे की केवळ भयकथा किंवा रहस्यकथा म्हणून त्यांची सरधोपट विल्हेवाट आपण लावू शकत नाही. कधी त्या कथांना विज्ञानाची जोड असते, कधी त्या आध्यात्मिक अनुभवांच्या अंगाने जातात, कधी त्यांना मानवी मनातल्या गूढ आणि अगम्य हालचालींची पार्श्वभूमी लाभते तर कधी निखळ विनोदाचा भयंकर अनुभूतीशी मजेदार गुणाकार होतो आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. या संग्रहातील काही कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतात. त्यामुळे तिथली भुतेखेते, समंध, खवीस, देवचार, मुंजे यांना त्या कथांत महत्त्वाचे स्थान लाभते. तिथला कधी सुंदर तर कधी भीषण असा निसर्गही कथेतल्या भीतीच्या छटा गडद करतो; पण हे सर्व असूनही या कथा मनात अंधश्रद्धा जागवत नाहीत किंवा तर्कविसंगत चमत्कारावरही भर देत नाहीत. त्यांचे त्यांचे म्हणून एक तर्कसंगत वास्तव या कथांत असतेच; आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. - शांता शेळके (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47657828024409,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/bhaykatha-d-p-khambete-1_bba0b225-72b0-463f-91cf-8a4a49526cd4.jpg?v=1793204381","url":"https:\/\/sahityavishwa.com\/products\/bhaykatha-d-p-khambete","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}