Press "Enter" to skip to content

‘खाली डोकं वर पाय’ झी मराठी सुट्टी विशेषांक २०१९

उन्हाळा म्हणजे लहान मुलांसाठी तर मोठी पर्वणीच. वार्षिक परीक्षा संपून सुटी लागते. अभ्यासाचे टेन्शन नसते. खेळ, ट्रिप आणि धमाल मस्ती. आई बाबांबरोबर देश परदेशात छानशी ट्रिप. सकाळी स्विमिंग, दुपारभर सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम, यांचा मस्त फड जमवायचा. खेळू नकोस अभ्यास कर म्हणून मागे लागायला कोणी नसते.

तिखट-मीठ लावलेल्या कैऱ्या, चिंचा, आवळे, आंबे, कुल्फी, बर्फाचा गोळा, नारळपाणी या गोष्टी खायच्या-प्यायच्या. अमुक सिनेमा पॉपकॉर्न खात पाहायचं; तमुक नवीन व्हिडीओ गेम खेळायची. अश्या अनेक गोष्टींची ‘समर हॉलिडे लिस्ट’ अनेक मुलांची तयार असेल आणि ते ती करतही असतील.

या मुलांच्या समर हॉलिडे लिस्टमध्ये आणखी एक गोष्ट झी मराठीने समाविष्ट केली आहे ती म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’ हा सुट्टी विशेषांक वाचायचा. या अंकात दिलीप काकांनी (दिलीप प्रभावळकर) ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकाच्या वेळी झालेली गंमत सांगितली आहे.

तसेच माधुरी ताई (माधुरी दीक्षित),  साटमकाका (शिवाजी साटम), भाऊ काका (भाऊ कदम), श्रेया ताई (श्रेया बुगडे), सई ताई (सई ताम्हणकर), कुशलदादा (कुशल बद्रिके), यांनी कोण-कोणत्या कारणामुळे आई-बाबांचा ओरडा-मार बसल्याची गोष्ट सांगितली आहे.

वैभव दादाने (वैभव वझे) रमा आणि स्वरा या दोन जिवलग मैत्रिणीची ‘बाहुबलीशी झालेली ग्रेट भेट’ वाचण्यासारखी आहे. परेश दादाने (परेश मोकाशी) लिहिलेला हुशार चिमू कुत्रीचा प्रवास ही छान आहे. संजय काकांची (संजय मोने) आटपाट नगराची गोष्ट आणि स्पृहा ताईचा (स्पृहा जोशी) ‘मजेशीर चांदोबा’ या गोष्टी नक्की वाचा.

संपादक : श्रीरंग गोडबोले
पृष्ठसंख्या : २००
किंमत : रु.१००/- 
प्रकाशक : झी मराठी / ग्रंथाली

‘खाली डोकं वर पाय’ झी मराठी सुट्टी विशेषांक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा.

Secured By miniOrange