Press "Enter" to skip to content

संपर्क

साहित्यविश्व

E-Mail : [email protected]

मोबाईल : +९१ ९९२१७१९३०९ whatsApp : +91 8788671695

‘एकमेका साहाय्य करू- मिळवू उत्तम पुस्तके!’
तुम्ही सगळे उत्तम वाचक आणि पुस्तकप्रेमी आहात, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही नेहमी छान-छान पुस्तकांच्या शोधात असता, तुमच्यासारखे अनेकजण असतात. मग एकमेका साहाय्य करू- मिळवू उत्तम पुस्तके !’ हे वचन लक्षात ठेवूया ! तुम्ही जे पुस्तक वाचाल, त्या पुस्तकाविषयी आपला अभिप्राय आम्हाला कळवा. तो आम्ही इतर वाचकांपर्यंत पोचवू. तुम्हाला जे पुस्तक उत्तम वाटेल, ते आमच्या सोबत शेअर करा. हे सहकार्य तुम्ही कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. आपल्याला आवडलेल्या पुस्तकाचा अभिप्राय आपल्या संपूर्ण नाव, पत्ता, ई-मेल , मोबाईल नंबर सह वरील ई-मेल वर पाठवा.

मुक्तमंच
आपल्यापैकी बऱ्याचजणांना लेखनाची हौस असते. वृत्तपत्रांच्या विविध पुरवण्यांमधून आपण असे स्फुट लेखन करीत असाल. काही खास आठवणी असतात; शाळेतल्या, कॉलेजमधल्या, सहलींच्या किंवा घरातील काही समारंभात घडलेल्या; तसेच घरात, घराबाहेर, प्रवासात, मित्रमैत्रिणीच्या गृपमध्ये आपण विविध प्रकारचे अनुभव घेत असतो. आपल्याला भेटणारी ‘माणसं’ हाही एक बोलकाविषय आहे. ऑफिसेसमध्ये कामासाठी गेल्यावरही भेटणारी माणसं आणि त्यांच्या कामाची पद्धत, सहकार्याची वृत्ती असणं किंवा नसणं या गोष्टी आपल्याला आपल्या कामासोबत खूप काही शिकवून जातात. कधीकधी गरीब माणूस मनाची श्रीमंती दाखवून जातो तर कधी एखादा श्रीमंत माणूस मनाचं दारिद्र्य समोर आणतो! व्यक्ती तितक्या प्रकृती! लिहायला विषयांची कमतरता नाही मग लगेच उचला पेन आणि लिहा मुक्तपणे! आमच्या ‘मुक्तमंच’ या सदरासाठी तुमच्या लेखनाची वाट पाहत आहोत. आपले विविध साहित्यप्रकारांतील लेखन आपल्या संपूर्ण नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर सह वरील ई-मेल वर पाठवा.

(आपण पाठवत असलेले लेखन स्वतः लिहिलेले असावे तसेच पूर्वप्रकाशित नसावे. नियम व अटी लाग.)

प्रकाशकांना आवाहन !
‘वाचाल तर वाचाल!’ हे आपले ब्रीदवाक्य आहे. प्रकाशित केलेले प्रत्येक पुस्तक वाचकांच्या हातात गेले पाहिजे, तरच प्रत्येक पुस्तकाला वाचक आणि प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळू शकेल! यासाठी आम्ही आपल्याला सहकार्य करू. आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे कव्हर, पुस्तकाचे परीक्षण (सुमारे ४५० ते ५०० शब्दांत),तसेच पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला असल्यास त्याचा फोटो, समारंभाची थोडक्यात माहिती आम्हाला खालील ई-मेल वर पाठवा. आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकांविषयी आपल्याला आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया, बालकांच्या संपूर्ण नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर सह आम्हाला पाठवा. आम्ही त्या जास्तीत-जास्त रसिक वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच रसिक वाचकांसाठी आपण करीत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती देखील पाठवा. ती आम्ही ‘साहित्यविश्व’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून साहित्याशी निगडित सर्व घटकांपर्यंत पोचवू.

Secured By miniOrange