{"title":"Sharankumar Limbale | शरणकुमार लिंबाळे","description":"\u003cp\u003eSharankumar Limbale Books, शरणकुमार लिंबाळे पुस्तके, Sharankumar Limbale Novels, Marathi Dalit Literature Books, मराठी दलित साहित्य, Sharankumar Limbale Autobiography, Akkarmashi Book,अक्करमाशी पुस्तक, Marathi Social Literature,\u003cbr\u003eMarathi Author Books Online\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"dalit-files-by-sharankumar-limbale","title":"दलित फाईल्स (Dalit Files)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दलित फाईल्स (Dalit Files)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 274\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'दलित फाईल्स' ही शरणकुमार लिंबाळे यांची नववी कादंबरी आहे. 'सेक्स आणि जात' या विषयाला ही कादंबरी धीटपणे भिडताना दिसते. हिंसा, जघन्य अपराध, अमानुष अत्याचार, जीवघेणी अंधश्रद्धा, प्रतिकूल परिस्थिती, जगण्यातला चिवट संघर्ष आणि भयानक जातीय तेढ यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. 'दलित जाणीव आणि दलित अनुभव' ही तर लिंबाळ्यांच्या लेखनाची शक्ती आहे. समाज, चळवळ आणि कार्यकर्ता ही त्यांच्या लेखनाची ऊर्जा आहे. ओघवती भाषा, काव्यात्मक शैली, वेधक वर्णन आणि वैचारिक वाद-विवाद यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. 'दलित फाईल्स' ही कादंबरी वाचताना मनावर ताण येतो; अपेक्षाभंग होतो आणि मन अंतर्मुख होते. ही कादंबरी विलक्षण अनुभवांचा प्रत्यय देणारी झाली आहे. - लक्ष्मण गायकवाड ('उचल्या'कार)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47932605235289,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dalit-Files-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795331221"},{"product_id":"dalit-sahitya-aani-saundrya-by-sharankumar-limbale","title":"दलित साहित्य आणि सौंदर्य (Dalit Sahitya Aani Saundrya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दलित साहित्य आणि सौंदर्य (Dalit Sahitya Aani Saundrya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 315\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दलित साहित्य ही एक जागतिक घटना आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातल्या प्रत्येक राज्यात दलित साहित्य आणि दलित चळवळीचा उदय झालेला आहे. देशाबाहेरही दलित साहित्य आणि दलित चळवळीचे लोण पोहोचले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर दलित साहित्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी, वंचितांची वाङ्मयीन अभिव्यक्ती जाणून घेण्यासाठी देशातील व परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये ह्या साहित्याचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश केलेला असून, ह्या साहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर शरणकुमार लिंबाळे ह्यांनी लिहिलेला 'दलित साहित्य आणि सौंदर्य' हा ग्रंथ संदर्भासाठी महत्त्वाचा वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47960981373017,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dalit-Sahitya-Aani-Saundrya-By-Dr-Sharankumar-Limbale.jpg?v=1795515417"},{"product_id":"akkarmashi-by-sharankumar-limbale","title":"अक्करमाशी (Akkarmashi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e अक्करमाशी (Akkarmashi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 118\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभवक्षेत्रात नेऊन सोडणाऱ्या अक्करमाशी ह्या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ्य आहे. ही संयमशीलता शरणकुमार लिंबाळे यांना प्रखर जीवनानुभवातूनच नव्हे तर जीवनाकडे गंभीर वृत्तीने पाहण्याच्या यथार्थदर्शनातून प्राप्त झाल्याचं पानोपानी जाणवतं. दलित साहित्यानं आधुनिक मराठी कथनाला एका विशाला सामाजिक पटावर आधीच नेऊन ठेवलं आहे. परंतु शरणकुमार लिंबाळे ह्यांनी दलितत्वाच्याही सीमा संकुचित वाटतील अशा निव्वळ मानवी परिघावर आपली कथावस्तू उभारली आहे. — भालचंद्र नेमाडे\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47961503662169,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Akkarmashi-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795515927"},{"product_id":"punha-akkarmashi-by-sharankumar-limbale","title":"पुन्हा अक्करमाशी (Punha Akkarmashi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e पुन्हा अक्करमाशी (Punha Akkarmashi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 120\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47961808765017,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Punha-Akkarmashi-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795516756"},{"product_id":"dalit-panther-by-sharankumar-limbale","title":"दलित पँथर (Dalit Panther)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दलित पँथर (Dalit Panther)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 264\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47965003448409,"sku":null,"price":412.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dalit-Panther-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795529844"},{"product_id":"dangal-by-sharankumar-limbale","title":"दंगल (Dangal)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दंगल (Dangal)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 124\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफुले आंबेडकर ह्यांच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान घेऊन सातत्याने प्रयोगशील साहित्यनिर्मिती करणारे शरणकुमार लिंबाळे हे दलित साहित्याची क्षितिजे विस्तारत नेणारे महत्त्वाचे परिवर्तनवादी लेखक आहेत. त्यांचे व्यापक समाजनिरीक्षण आणि सूक्ष्म आत्मविश्लेषक दृष्टी ह्यामुळे त्यांच्या साहित्याला मिळणारी परिमाणे मराठी साहित्यक्षेत्राबाहेरची मान्यता मिळवून देणारी ठरली आहेत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दंगल' ह्या लघुकादंबरीत त्यांनी दलित पँथरचा जन्म व विकासक्रम ह्यांचा एक जिवंत आलेखच सादर केला आहे. दलित चळवळीवरची ही कृत्ती अनन्यसाधारण अशी आहे कारण ह्या सर्व प्रक्रियेत लेखक स्वतः सक्रिय होता. पापणी जागी ठेवून लिहिलेली ही कहाणी आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'परपुरुष' ह्या लघुकादंबरीत शरणकुमार लिंबाळे, सामाजिक व प्रशासकीय संस्थांमधील व्यवस्थेचे आणि त्यामध्ये संसर्गजन्य रोगासारख्या पसरणाऱ्या भ्रष्टाचाराचे वास्तववादी चित्रण करताना पुन्हा आपल्या अनुभवाचं सृजनशील रूपांतर करतात.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या दोन्ही लघु कादंबऱ्यांची प्रत्ययपूर्ण भाषा, सजीव चित्रण, पात्रांची अंतर्बाह्य ओळख, त्यांचे परस्पर संवाद-विसंवाद आणि लेखकाची निर्भीड परखड शैली ह्यातून वाचकाला समग्रपणे समकालीन परिस्थितीचे भान आल्याशिवाय रहाणार नाही. -निशिकांत ठकार\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47965318611033,"sku":null,"price":98.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dangal-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795530213"},{"product_id":"dalit-bramhan-by-sharankumar-limbale","title":"दलित ब्राह्मण (Dalit Bramhan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e दलित ब्राह्मण (Dalit Bramhan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 208\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"शरणकुमार लिंबाळे ह्यांचा 'दलित ब्राम्हण' हा कथासंग्रह दलित साहित्य, चळवळ आणि समाज ह्याचे एक जळजळीत उदाहरण आहे. ह्या संग्रहातल्या अनेक कथा भारतीय भाषांमध्ये अनुवादित होऊन चर्चित ठरल्या आहेत. गावगाड्यातील दलिताची होणारी घुसमट, शिकून समाजापासून तुटलेल्या पांढरपेशा दलितांची झालेली घोर नाकेबंदी आणि दलित प्रेमतील दाहक सामाजिक संदर्भ ह्या ताण-तणावातून ह्या कथा स्फूरल्या आहेत. वाचकांची मूल्यदृष्टी आणि परिवर्तनावरील श्रद्धा दृढ करणाऱ्याच्या ह्या कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदलित आणि दलित्तेर समाजजीवनातील सनातन द्वंद्व चित्रीत करणाऱ्या ह्या कथा स्फूरल्या आहेत. वाचकांची मूल्यदृष्टी आणि परिवर्तनावरील श्रद्धा दृढ करणाऱ्या कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदलित आणि दलितेत्तर समाजजीवनातील सनातन द्वंद्व चित्रीत करणाऱ्या ह्या कथा आहेत. ह्या पुस्तकात माणुसकीसाठी केलेला चिरंजीव आक्रोश आणि संवेदनाक्षम मनांना ऐकू येणाऱ्या चिरंतन हाका निनादताना दिसतात. हिंदीत बहुचर्चित ठरलेल्या अनुवादित 'दलित ब्राम्हण' ह्या ग्रंथाचा हा मूळ मराठी अविष्कार आहे.\"\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47965642129497,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dalit-Bramhan-By-sharankumar-Limbale.jpg?v=1795530964"},{"product_id":"nilya-pahadachya-mulakhati-by-sharankumar-limbale","title":"निळ्या पहाडाच्या मुलाखती (Nilya Pahadachya Mulakhati)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e निळ्या पहाडाच्या मुलाखती (Nilya Pahadachya Mulakhati)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 172\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशरणकुमार लिबाळे यांचा 'अक्करमाशी' ते 'सनातन' असा लेखनप्रवास बहुविध स्वरूपाचा आहे. त्यांच्या साहित्यातील जातजाणिवा, इतिहासाची जाण, पर्यायी सौर्दशास्त्र, दलित शैलीविचार आणि वर्तमानाच्या बहुमुखी भानामुळे लिंबाळे यांना भारतीय पातळीवर लेखक म्हणून मान्यता मिळाली, लेखक, विचारवंत आणि समीक्षक असणाऱ्या लिवाळे यांच्या या मुलाखतीमधून, त्यांच्या वाड्मयविचारविश्वाबरोबर भाषांतरविद्या व आजच्या सांस्कृतिक पर्यावरणावरील भाष्य आहे. भाषांतरव्यवहार व भाषांतर परकाया प्रवेशामुळे त्यांना देश-विदेशात मान्यता मिळाली. या त्यांच्या साहित्याच्या भाषांतराविषयीच्या अनुभवांनी या मुलाखतींना वेगळेपणा प्राप्त झाला आहे. तसेच या मुलाखतींचा एक मुख्य भाग हा 'सरस्वती सन्मान' प्राप्त 'सनातन' या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीविषयी आहे. तो प्रतिसाद व प्रतिवादाच्या स्वरूपाच आहे. याबरोबरच त्यांच्या या मुलाखती चितनात आंबेडकरी चळवळीची वाटचाल, तिचे यशापयश व मर्यादांवर भाष्य आहे. दलित पँथरच्या सामर्थ्यस्थानाच्या व आंबेडकरी प्रेरणेच्या विश्वासनोंदी आहेत. तसेच दलित साहित्यातील अंतर्विरोधांवर भाष्य आहे. हे सर्व त्यांच्या मनातील सहज वाहतेपणाच्या आस्थेपोटी प्रकटले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलिबाळे यांच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'काल'च्या नॉस्टॉल्जियामध्ये फारसे रमत नाहीत. समाज, इतिहास आणि वाङ्मयाचा ते आजच्या संदर्भात विचार करतात. प्रस्थापितांचा मौनाचा प्रदेश आणि अस्मितांच्या छावण्यांतील टोकाच्या आग्रह पार्श्वभूमी ते समाज आणि सांस्कृतिक व्यवहाराकडे चिकित्सेच्या अंगाने पाहतात. तसेच त्यांना दडप काळातील विचारवंतांच्या खुनांनी अस्वस्थ केले आहे. लिंबाळे यांच्या मुलाखतीतील परखड असे वाग्बाण हिंदुत्ववाद्यांना जसे झोंबणारे आहेत, तसेच आंबेडकरवाद्यांनादेखील. याबरोबरच या मुलाखतीत जागतिकीकरण काळाविषयी व त्यांच्या वाङ्मयीन प्रवासाच्या खुणा आहेत. चौफेर चितनाला महत्त्व असणाऱ्या मुलाखतीसारख्या प्रकारातून लिबाळे यांच्या विचारांचा मुक्त चितनाविष्कार आहे. लिंबाळे यांच्या या चितनसुरात चिकित्सक वस्तुनिष्ठता आहे, तसाच प्रामाणिक परखडपणाही. त्यांच्या विचारांत नव्या काळाचे व नव्या जीवनाचे स्वागत आहे. समाज आणि साहित्याच्या संदर्भात त्यांना जातशोषणमुक्ती, समता व माणुसकीचा स्वर महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे इतिहासाची जाणीव शबलित होत असलेल्या समकाळात, लिंबाळे यांचा निळ्या पहाडातील हा चितनप्रदेश अधिक महत्त्वाचा आणि मौलिक ठरतो. - प्रा. रणधीर शिंदे\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47966138826841,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Nilya-Pahadachya-Mulakhati-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795531866"},{"product_id":"tumchi-jaat-kay-by-sharankumar-limbale","title":"तुमची जात काय (Tumchi Jaat Kay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e तुमची जात काय (Tumchi Jaat Kay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 192\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“कवितेचा ‘आदिबंध’ जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश ‘खोलवर प्रतिक्रियात्मक’ असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्रोत तिच्यात आहे.” -जी. के. ऐनापुरे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47966901370969,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Tumchi-Jaat-Kay-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795532668"},{"product_id":"समन्वय-शरणकुमार-लिंबाळे-यांच्या-मुलाखती-samanvay-sharankumar-limbale-hyanchya-mulakhati","title":"समन्वय : शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखती (Samanvay : Sharankumar Limbale Hyanchya Mulakhati)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e समन्वय : शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखती (Samanvay : Sharankumar Limbale Hyanchya Mulakhati)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e संपादक - डॉ. विजयकुमार खंदारे (\u003cspan\u003eDr. Vijaykumar Khandare\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 247\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजातींच्या उच्च-नीच स्तरांवर उभारलेल्या समाजाची खरी खुरी वेदना काय असते ते फक्त तळचा माणूसच सांगू शकतो. कारण त्याने ते अनुभवलेले असते. म्हणून त्याचे समाज, संस्कृती आणि धर्मावरचे भाष्य अस्सल मानवतेला आवाहन करणारे असते. असे मानवतेला आवाहन करणारे लेखक म्हणजे शरणकुमार लिंबाळे हे होत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या अर्धशतकापासून निष्ठेने लेखन करणाऱ्या शरणकुमार लिंबाळे यांना जन्मापासूनच उपेक्षा, दारिद्र्य आणि दुःखाशी सामना करावा लागलेला आहे. आजही ते उपेक्षेचा सामना करीत आहेत. उपेक्षेने आणि संघर्षाने वेढलेल्या या लेखकाला भारतीय धर्म आणि संस्कृतीचे अंतरंग नेमकेपणाने कळले आहे. किंबहुना हेच त्यांचे सामर्थ्य आहे. त्यांचा आणखी एक विशेष असा की, ते सरळ ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देतात. अशा या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या लेखकाच्या मुलाखतींचे संपादन डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले आहे, ही अतिशय स्वागतार्ह घटना आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. विजयकुमार खंदारे, हे साहित्याचे जाणकार आणि साक्षेपी अभ्यासक आहेत. शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया मुलाखती मराठी समाज आणि संस्कृतीला अंतर्मुख करतील अशी मला खात्री आहे. -डॉ. नागनाथ कोत्तापल्ले\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47967137529945,"sku":null,"price":262.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Samanvay-Sharankumar-Limbale-Hyanchya-Mulakhati.jpg?v=1795533311"},{"product_id":"vande-mataram-by-sharankumar-limbale","title":"वंदे मातरम (Vande Mataram)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e वंदे मातरम (Vande Mataram)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'आंबेडकरवाद आणि हिंदूत्ववाद' ह्या विषयी आंबेडकरी चळवळीत टोकाची मते आहेत. काही दलित लेखकांना 'हिंदूत्ववादी' ठरवून त्यांना वेगळे पाडण्याचे कुटील डाव खेळले गेले. दलितांमधल्या एका गटाची दिशाभूल करणारी ही पोटदुखी आहे. 'वंदे मातरम्' ही शरणकुमार लिंबाळे ह्यांची कादंबरी एका दलित लेखकाला हिंदूत्ववादी ठरवून त्याची कशी शिकार केली जाते ह्याचा दंभस्फोट करते. क्रांती आपल्या अपत्याचेच कसे भक्षण करते ह्याचे विदारक वास्तव 'वंदे मातरम्' या कादंबरीने चव्हाट्यावर आणलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47967966232665,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Vande-Mataram-by-Sharankumar-Limbale.jpg?v=1795541040"},{"product_id":"upalya-by-sharankumar-limbale","title":"उपल्या (Upalya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e उपल्या (Upalya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 172\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47967997853785,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Upalya-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795541511"},{"product_id":"brahmanya-by-sharankumar-limbale","title":"ब्राम्हण्य (Brahmanya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e ब्राम्हण्य (Brahmanya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 215\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47968016793689,"sku":null,"price":172.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Brahmanya-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795544710"},{"product_id":"dhudgus-by-sharankumar-limbale","title":"धुडगूस (Dhudgus)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e धुडगूस (Dhudgus)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 112\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'धुडगूस' हा शरणकुमार लिंबाळे ह्यांच्या विद्रोही दलित कवितांचा संग्रह आहे. समकालीन सामाजिक आणि राजकीय स्फोटक परिस्थितीची तमाम स्पंदनं ह्या कवितांमध्ये बेधडकपणे व्यक्त झालेली दिसतील. समाजमनातील धग आणि धडका उद्रेकाच्या रूपात ह्या कवितांच्या ओळी-ओळींमधून प्रखरपणे प्रकट झालेल्या आहेत. माणसाच्या मुक्तीचे सुंदर स्वप्न पाहणारी आणि सुजलाम् सुफलाम् राष्ट्राची मांडणी करणारी ही अभिव्यक्ती भावणारी आहे. माणसाच्या जगण्याविषयी अपार आस्था असलेली कविता वाचताना सामाजिक परिवर्तनाची तीव्र निकड भासू लागते. हेच ह्या कवितांचे यश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47968081543257,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Dhudgus-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795542661"},{"product_id":"ramrajya-by-sharankumar-limbale","title":"रामराज्य (Ramrajya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e रामराज्य (Ramrajya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 312\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'ही राम-रावणाची कथा नाही, आजही वनवासात जगणाऱ्या लोकांचं हे रामायण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eपदोपदी अनुभवाला येणारं हे भगभगीत समाज-वास्तव आहे. स्वातंत्र्य मिळालं, पण कोणाला?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअजूनही इथले भय संपत नाही. धर्म, जात, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने लोकशाहीला विळखा घातला आहे. दलित समाज तर रोजच भरडला जातोय. प्रभू रामचंद्राने बारा वर्षे वनवास भोगला; दलित हजारो वर्षे वनवास भोगत आहेत. त्यांचा वनवास कधी संपणार आहे? ज्यांच्या दुःखाची कधी दखल घेतलीच नाही, त्या शेवटच्या माणसाची ही कथा आहे.'\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47968107135065,"sku":null,"price":322.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Ramrajya-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795543288"},{"product_id":"udrek-by-sharankumar-limbale","title":"उद्रेक (Udrek)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e उद्रेक (Udrek)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 122\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशरणकुमार लिंबाळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या महायुद्धात उडी घेतात. पँथरच्या चळवळीशी, नामांतराच्या चळवळीशी शरणकुमार लिंबाळेचे मन घट्ट नाते जोडते. समाजातील अत्याचारांचे वाचन करते. या सर्व धगधगत्या आंदोलनाशी शरणकुमार लिंबाळे मनानेच बांधले जातात. शरणकुमार लिंबाळेच्या वाट्याला मग महायुद्धातील सैनिकाचेच जीवन येते. ते कायम अस्वस्थ असतात. वणव्यासारखे कायम धगधगत असतात. त्यांच्या मनाच्या युद्धभूमीवर सारखे स्फोट घडत असतात आणि याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या युद्धात जन्मलेल्या या कलावंताला किती लिहू किती धगधगू असे होते. शरणकुमार लिंबाळेच्या वागण्यात आणि बोलण्यात ही असीम अस्वस्थता आणि असीम बेचैनी मी पाहिलेली आहे. - यशवंत मनोहर\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47977404923993,"sku":null,"price":97.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Udrek-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795616285"},{"product_id":"ranimashi-by-sharankumar-limbale","title":"राणीमाशी (Ranimashi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e राणीमाशी (Ranimashi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'राणीमाशी' ही पती-पत्नी आणि प्रेयसीची आत्मकथा आहे. ह्या तीन नात्यांतील चिवट जिवंतपणा आणि आत्मसंघर्ष हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, घालमेल आणि जीवघेणी घुसमट ह्यात व्यक्त झाली आहे. प्रेमाच्या त्रिकोणांतला विरह आणि विद्रोह, भेटीगाठी आणि ताटातूट, रूप आणि कुरूपाचा उत्सव या लेखनातून अनुभवता येतो. स्त्री-पुरुष ह्या सनातन संबंधातील नित्य नूतनपणा अनिवार ओढीने इथं प्रकट झाला आहे. हे मनाच्या पातळीवरचं जगणं आहे. मन आणि शरीरातल्या सनातन संघर्षाची ही आत्मकथा आहे. विरंजीव नात्यांची स्वप्नं चिरडताना होणारा आक्रोश 'राणमाशी'तून व्यक्त झाला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47978136272985,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Ranimashi-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795617337"},{"product_id":"gaavkusabaheril-katha-by-sharankumar-limbale","title":"गावकुसाबाहेरील कथा (Gaavkusabaheril Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e गावकुसाबाहेरील कथा (Gaavkusabaheril Katha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 207\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगावकुसाबाहेरील माणसाला हजारो वर्षापासून शाख, शत्र, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवले आहे. गावकुसाबाहेरील माणसाच्या शोषणावरच प्रस्थापित विषम व्यवस्थेचं भरण पोषण झालं आहे. बहिष्कृत माणसाची सावली, स्पर्श वाणि आणि विचार अपिवत्र माणण्यात आला दलित माणसाचं माणूसपण नाकारण्यात आलं. जातिव्यवस्थेच्या अमानुष गुलामीत एक विराट मानवसमूह निमूटपणे जगत राहिला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगाव आणि गावाबाहेरील गाव अशा दोन वर्तुळात गाव वसलेला. देशभर हेच चित्र. गावात भारत, गावकुसाबाहेर बहिष्कृत भारत. बहिष्कृत समाजाची वेदना जीवघेणी आहे. त्यांच्यासाठी वेगळी वस्ती, वेगळा पाणवठा, वेगळी जागा, मंदिरात पायरीजवळची जागा. समाजातल्या ह्या 'पायऱ्या' न मोडणाऱ्या. शेवटचा माणूस जातिव्यवस्थेला आपल्या पूर्वकर्माचं फळ. आपलं नशीब समजून जगत होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगावकुसाबाहेर गावाभोवती वस्ती करुन राहणाऱ्या जाती अस्पृश्यतेचं दारुण दुःख घेऊन जगल्या. अशा दलितांच्या घोर विटंबना व क्रूर शोषण व्यक्त करणाऱ्या कथांचा हा संपादित ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47978612949081,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Gaavkusabaheril-Katha-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795618092"},{"product_id":"bahujan-by-sharankumar-limbale","title":"बहुजन (Bahujan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e बहुजन (Bahujan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 216\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभासंपन्न दलित लेखक आहेत. त्यांनी दलित चळवळीवर विपुल लेखन केलं आहे. दलित समाज आणि आंबेडकरी विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यांची 'बहुजन' ही कादंबरीदेखील ह्याला अपवाद नाही. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन दलित शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. ही बहुजनांच्या चळवळीची आत्मकथाच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'उपल्या', 'हिंदू' आणि 'बहुजन' ह्या तीन कादंबऱ्यांमधून लिंबाळे दलितांच्या समकालीन प्रश्नाला भिडले आहेत. 'बहुजन' ही कादंबरी म्हणजे विषम व्यवस्था उद्ध्वस्त करणारी जणू यंत्रणाच आहे.\"- रामदास आठवले\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47978915135577,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Bahujan-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795618723"},{"product_id":"hindu-by-sharankumar-limbale","title":"हिंदू (Hindu)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e हिंदू (Hindu)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e शरणकुमार लिंबाळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Sharankumar Limbale)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 164\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\" हिंदू समाजातील विषमतेचा चेहरा धारण केलेली ही कादंबरी आहे. एकीकडे उग्र हिंदुत्वाची लाट आणि दुसरीकडे त्याविरुद्ध संघटित होणारी दलितांमधील आत्मसन्मानाची जाणीव ही या कादंबरीची वीण आहे. सामाजिक तणावाच्या रसायनातून ह्या कलाकृतीचा जन्म झाला आहे. हिंदू धर्मावरील जातियतेचा कलंक किती काळाकुट्ट आहे याची प्रचिती आणून देणारी ही कादंबरी आहे. 'वासना' आणि 'विद्रोह' या सरमिसळीतून या कादंबरीचे रुप प्रकट झाले आहे. दलितांमधल्या दुफळीचे, चळवळीच्या आश्रयाने वाढणाऱ्या चंगळवादाचे, न्याय-अन्यायाचे विदारक चित्र रेखाटणारी ही कादंबरी म्हणजे दलितांच्या राजकीय हक्कांची कैफियत आहे.\"\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47979138908249,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Hindu-By-Sharankumar-Limbale.jpg?v=1795619198"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/sharankumar-limbale.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}