{"title":"मराठी अनुवादित | Marathi translated","description":"\u003cp\u003eमराठी अनुवादित | Marathi translated\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"kudiya-by-uma-kulkarni","title":"कुडीय (Kudiya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e कुडीय (Kudiya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e के. शिवराम कारंत (\u003cspan\u003eKota Shivarama Karanth\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : उमा कुलकर्णी (Uma Kulkarni)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 298\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. के. शिवराम कारंत या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या लेखकाची ही आणखी एक सशक्त देशीपणानं परिपूर्ण कलाकृती. जीवनाच्या अखेरपर्यंत पर्यावरणाच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याऱ्या निसर्गवेड्या कारंतांची निसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'कुडिय' समाजाच्या सुख-दुःखांचा वेध घेऊ पाहणारी कलाकृती. विशाल निसर्गाच्या कुशीत, डोंगरदऱ्यांत वावरणाऱ्या या निसर्ग-पुत्रांच्या भावजीवनातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक उलाढाली आणि माणसा-माणसांतील संबंधांचे विविध पदर उलगडणारी कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685307859033,"sku":null,"price":337.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Kudiya-uma-kulkarni-1.jpg?v=1793379147"},{"product_id":"saiberiyatun-palayan","title":"सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e सैबेरियातून पलायन (Saiberiyatun Palayan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e जे. एम. बॉअर (J.M. Bauer)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : वसुधा माने (Vasudha Mane)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 198\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन सजा काराग्रहात भोगत असताना तिथून आपल्या गावाच्या, मातृभूमीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीनं, विलक्षण धाडस करून तुरुंगातून पळाला. सलग तीन वर्षं - कधी बर्फातून तर कधी रणरणत्या उन्हातून, कधी रेल्वेतून तर कधी नावेतून प्रवास करून, विलक्षण जिद्दीने तो पुन्हा आपल्या घरी परतला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचा हा तीन वर्षांचा चित्तथरारक प्रवास म्हणजे त्याची अनोखी कहाणी! अत्यंत वाचनीय! वाचकाला खिळवून ठेवणारी! या एका कहाणीत अनेक कहाण्या दडल्यात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या महायुद्धाचे अंतरंग उलगडताना, या महायुद्धाचा जगभरातल्या सामान्य माणसांना किती आणि कसा फटका बसला, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती नाहक बळी गेले, हे सांगणारी ही कहाणी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रवासात फोरेलला अनेक प्रकारची माणसे भेटली. दुष्ट, चोर वृत्तीची, शिकारी , त्याच बरोबर प्रेम करणारी ,समजून घेणारी ,तर कधी जीव घ्यायला उठलेली!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया साऱ्या अनुभवांचा मिळून झालेला हा प्रवास म्हणजे फोरेलची कहाणी ! सैबेरियातून पलायन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47700311736409,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/saiberiyatun-palayan-j-m-bauer-1.jpg?v=1793552230"},{"product_id":"jivanbhashya-khand-1-2-3-by-j-krishnamurti","title":"जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e जीवनभाष्ये संच (भाग १, २, ३) (Jivan Bhashya Khand 1, 2, 3)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e जे. कृष्णमूर्ती (J. Krishnamurti)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator :\u003c\/span\u003e विमलाबाई देशपांडे (\u003cspan\u003eVimalabai Deshpande\u003c\/span\u003e)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 352, 328, 404\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी Commentaries On Living त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47712965427289,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/jivanbhashye-khand-j-krishnamurti-1.jpg?v=1793635071"},{"product_id":"deserter-by-vijay-devdhar","title":"डेझर्टर (Deserter)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e डेझर्टर (Deserter)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e गंथर बान्हमान (Gunther Bahnemann)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : \u003cspan\u003eविजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 366\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगंथर बान्हमान यांच्या ‘आय डेझर्टेड रोमेल’ या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे. हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे. रोमेल २१व्या पँझर डिव्हिजन मधून निसटले. सहारा वाळवंटाचा वालुकामय प्रदेश ओलांडून त्यांना आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचायचे होते. सुमारे तीन हजार मैलांचा हा खडतर प्रवास गंथर यांनी सुरु केला. आणि अनेक थरारक प्रसंगाना ते सामोरे गेले. अनेक प्राणघातक संकटे त्यांच्यावर कोसळली. त्यातूनही ते निसटत गेले. ते कसे हे पुस्तकातच वाचणे योग्य…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47799666540633,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/deserter-by-vijay-deodhar.jpg?v=1794321631"},{"product_id":"tao-te-ching-by-lao-tzu","title":"ताओ ते चिंग (Tao Te Ching)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e ताओ ते चिंग (Tao Te Ching)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e लाओ त्सू\u003cspan\u003e (Lao Tzu)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : अवधूत डोंगरे (Avdhut Dongre)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 116\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eताओ ते चिंग ही अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झालेली संहिता. लाओ त्सू या ज्ञानी मनुष्यानं तिची रचना केली. एक बायबलचा अपवाद केला तर जगात सर्वाधिक भाषांमध्ये ह्या संहितेची भाषांतरं झाली आहेत. केवळ इंग्रजीतच ताओ ते चिंग या संहितेची शंभरहून अधिक भाषांतरं उपलब्ध आहेत, आणि प्रत्येक वर्षी आणखी नव्या भाषांतरांची भर यात पडत असते. तरी या संहितेची, त्यातील तत्त्वज्ञानाची भुरळ दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसते. ताओ आणि ते या दोन तत्त्वांद्वारे माणूस आणि निसर्ग यांच्या एकात्म सहजीवनासाठी मूलभूत आणि अनिवार्य अशा जीवनमार्गाकडे निर्देश करणारी ही संहिता जे जे स्थलकाल सापेक्ष त्या त्या साऱ्या गोष्टिंची क्षणभंगुरता आणि मिथ्या प्रकृती अधोरेखित करत शाश्वत जीवनमार्गाचे अनुसरण करण्यासाठी आवाहन करते.\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47860808876121,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Tao_Te_Ching.jpg?v=1794640410"},{"product_id":"the-library-by-zoran-zivkovic","title":"द लायब्ररी (The Library)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e द लायब्ररी (The Library)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e झोरान झिवकोविच (Zoran Zivkovic)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : नितीन रिंढे (Nitin Rindhe)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 132\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'द लायब्ररी' या पुस्तकातल्या सर्व कथा पुस्तक या वस्तूभोवती फिरत असल्या तरी, शेवटच्या कथेचा नायक म्हणतो त्याप्रमाणे यातल्या प्रत्येक कथेची चव वेगळी आहे. या कथांमधली पात्रं पुस्तकं जमवणारी, वाचणारी, लिहिणारी आहेत. पण सर्व कथांचा खरा नायक आहे पुस्तक. पुस्तकंच या मानवी पात्रांवर वर्चस्व गाजवतात; त्यांच्या आयुष्यात प्रश्न निर्माण करतात. दैनंदिन सर्वसामान्य तर्कबद्ध जीवनातल्या पुस्तक नावाच्या वस्तूला झिवकोविच तर्कापलीकडच्या अद्भुत जगात नेतो. या जगात पुस्तकांना चव असते आणि लेखकांच्या शरीराला वेदनेचा गंध असतो; पुस्तक माणसाच्या अस्तित्वावर अतिक्रमण करतात किंवा मिटली की नाहीशी होतात. पुस्तक टिकवण्यासाठी कथानायकाला या अत्याधुनिक काळातही हस्तलिखित परंपरेकडे वळावं लागणं, किंवा जिवंतपणे मुळीच वाचन न करणाऱ्यांना नरकात 'वाचना'ची शिक्षा ठरवली जाणं- लेखकाने सध्याच्या समाजात पुस्तकाविषयी असलेल्या (अ)संवेदनशीलतेवर सूचक भाष्य केला आहे. या कथा सांगतात त्याहून सुचवतात कितीतरी अधिक. खेळकर आणि गंभीर, काव्यात्म आणि उपासात्मक अशा वैविध्यपूर्ण अनुभवांतून हे सुचवणं असतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47860824342617,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/The_Library.jpg?v=1794651021"},{"product_id":"the-house-of-paper-by-abhishek-dhangar","title":"द हाउस ऑफ पेपर (The House of Paper)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e द हाउस ऑफ पेपर (The House of Paper)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e कार्लोस मारिया दोमिंगेझ् (Carlos María Domínguez)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : अभिषेक धनगर (Abhishek Dhangar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e कृष्णा पब्लिकेशन्स (Krishna Publications)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 113\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकं वाचणं, पुस्तकांचा शोध घेणं, संग्रह करणं, आपल्या व्यग्र जीवनात फुरसतीचे काही तास रोज बाजूला ठेवून पुस्तकांच्या जगात हरवून जाणं, या राखून ठेवलेल्या वेळेच्या आधारावर आयुष्याचे घाव सोसत राहणं... ही प्रक्रिया वाचकाला आनंददायी आणि हवीहवीशी वाटत असते; पण ग्रंथसंग्रहाच्या आवडीचं वेडात रूपांतर झालं, की खिशाला कात्री लावून महागडी पुस्तकं विकत घेणं, त्यासाठी हळूहळू जगण्याचे सगळे प्राधान्यक्रम बाजूला सारत पुस्तकं अग्रक्रमाला येणं, आधी एक फडताळ, मग एक कपाट, नंतर एक खोली असं करत पुस्तकांना सगळ्या घराचा ताबा घेऊ देणं, संग्रहाची वर्गवारी करणं या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे सगळं समोर दिसत असूनही ग्रंथवेड काही वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. आणि हे वेड अखेरीस जे दुःस्वप्न वाचकापुढं उभं करतं, त्या दुःस्वप्नाची ही कादंबरी. एक अविस्मरणीय असा भीषण सुंदर अनुभव ती वाचकाला देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Krishna Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47861987311705,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/The_House_Of_Paper.jpg?v=1794648619"},{"product_id":"ravindranathanchya-sahavasat-by-maitreyi-devi","title":"रवीन्द्रनाथांच्या सहवासात (Ravindranathanchya Sahavasat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e रवीन्द्रनाथांच्या सहवासात (Ravindranathanchya Sahavasat)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e मैत्रेयी देवी (Maitreyi Devi) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : विलास गीते (Vilas Gite)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 219\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्रीमती मैत्रेयी देवी यांनी 'मंग्पूते रबीन्द्रनाथ' नावाचे, कविश्रेष्ठ रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या हृद्य आठवणींविषयीचे एक नितांत सुंदर पुस्तक बंगालीत लिहिले आहे. रवीन्द्रनाथांच्या नाना छटा असलेल्या स्वभावविशेषांचे अनोखे दर्शन या पुस्तकात घडते. 'मंग्पूते रबीन्द्रनाथ'चा हा मराठी अनुवाद 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात.' 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात' हा अनुवाद छान झाला आहे. एका महाकवीच्या सहवासाची ही कहाणी आहे. अतिशय हृद्य असे हे पुस्तक मराठीत येत आहे याचे मला फार समाधान वाटले. - पु. ल. देशपांडे 'रवीन्द्रनाथांच्या सहवासात' हा अनुवाद वाचला. वाचताना हरवून गेलो. अनुवाद उत्तम उतरला आहे. कितीतरी प्रसंगांतला गोडवा आणि हळुवारपणा मैत्रेयी देर्वीनी अचूक शब्दांत पकडला आहे. शैलीही ओघवती वाटली. अनुवादातून ही सारी प्रचीती घडविल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. - आनंद अंतरक रवीन्द्रनाथांबद्दल अक्षरशः असंख्य पुस्तके आहेत; पण 'मला रवीन्द्रनाथांवरील फक्त एक आणि एकच पुस्तक वाचायचे आहे.' असे मला कुणी म्हणाले, तर मी निःशंकपणे या पुस्तकाची शिफारस करीन. - बा. भ. बोरकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47878107725913,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Ravindranathanchya-Sahavasat.jpg?v=1794892893"},{"product_id":"fahrenheit-451-by-ray-bradbury","title":"फॅरनहाईट ४५१ (Fahrenheit 451)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e फॅरनहाईट ४५१ (Fahrenheit 451)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e रे ब्रॅडबरी (Ray Bradbury) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : माया पंडित (Maya Pandit)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 203\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफॅरेनहाईट ४५१ ही अमेरिकन इंग्रजी वाङ्मयातील एक अजरामर कादंबरी आहे. भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भयावह जगाचं भाकीत करणारी ही विलक्षण कथा आपल्याला अक्षरश: झपाटून टाकते. ही कादंबरी जगाचा 'वाङ्मयोत्तर' भविष्यकाळ आपल्यासमोर साक्षात उभा करते. 'फॅरेनहाईट ४५१' ही कादंबरी जॉर्ज ऑरवेलच्या '१९८४' आणि आल्डस हक्सलेच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' यांच्या तोडीची आहे. माध्यमं, नशिली ड्रग्ज आणि समाजातील प्रस्थापित समज यांच्या विखारी प्रभावांचा गुलाम झालेल्या पाश्चात्त्य जगाचं चित्र ती आपल्यासमोर रंगवते. रे ब्रॅडबरीची भाषा समर्थ गद्य नि काव्यात्मक पद्य यांचा अद्भुत संयोग साधते. तंत्रज्ञानाच्या विकासक्षमतांचा नकाशा मांडून त्यात दडलेल्या शक्यतांचा ती मर्मभेदी वेध घेते. या कादंबरीच्या प्रकाशनाला आता ५० वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या धक्कादायक नि स्तिमित करणाऱ्या मांडणीमुळे तिची वाचकांवरची मोहिनी अद्यापही कायम आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47878235881561,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Fahrenheit-451.jpg?v=1794893766"},{"product_id":"bhatakantee-by-hermann-hesse","title":"भटकंती (Bhatakantee)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e भटकंती (Bhatakantee)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e हेरमान हेसे (Hermann Hesse)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : रेणुप्रसाद पत्की (Renuprasad Patki)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 120\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहेरमान हेसेच्या 'भटकंती' (मूळ जर्मन : Wanderung) या पुस्तकात त्याने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीची वर्णनं येतात. निसर्ग आणि काही प्रमाणात दैनंदिन मानवी जीवनातील घटकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या वर्णनांना मुक्तचिंतनाचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गदर्शनातून आत्मदर्शन हा या भटकंतीचा मूळ उद्देश आणि म्हणूनच या लेखांचे मुख्य सूत्र आहे, असं म्हणता येईल. हेसेला अपेक्षित असणारी भटकंती ही त्यामुळे तथाकथित अर्थाने भटकंती नाही, तसंच त्याला अपेक्षित असणारा भटक्या देखील तथाकथित भटक्यांपेक्षा वेगळा आहे. तो स्वतःच्या आणि जीवनार्थाच्या शोधात आहे. तो जीवनोत्सुक आहे, जीवनाच्या मूळ प्रक्रियेत त्याला रस आहे. आणि तो निसर्गनिरीक्षण आणि आत्मनिरीक्षण यांत भेद करत नाही. निसर्गाकडे परत जाण्याचा रस्ता हाच त्याच्यासाठी स्वतःपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. हेसेच्या या पुस्तकातील लेख वाचकाला निसर्गाची आणि निसर्गाच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची नव्याने ओळख करून देतील आणि अंतर्मुख करतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880128987225,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Bhatakantee.jpg?v=1794841276"},{"product_id":"papilon-ravindra-gujar","title":"पॅपिलॉन (Papilon)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e पॅपिलॉन (Papilon)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e हेन्री शॅरीयर (Henri Charrière)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : रवींद्र गुर्जर (Ravindra Gujar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 364\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाहित्य नव्या जाणिवांनी परिपूर्ण होऊ लागल्यानंतर, एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या, पण सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे सत्यदर्शन 'पॅपिलॉन' मध्ये घडते.\u003cbr\u003eजबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो, हे 'पॅपिलॉन' वरून समजेल.\u003cbr\u003e'पॅपिलॉन' म्हणजे फुलपाखरु. हेन्नी शैरियरचे गुन्हेगार जगतातील ते टोपण नाव. त्याचा जन्म १६ नोव्हेंबर १९०६ रोजी दक्षिण फ्रान्समधील 'आर्डिक' या गावी झाला. थोड्याच अवधीत त्याने शहरातील गुन्हेगार जगामध्ये महत्त्वाची जागा मिळवली. पुढे पोलिसांच्या कारवाईला बळी पडून, मनुष्यवधाच्या खोट्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली. सात वेळा पलायन करण्याच्या प्रयत्नात आलेल्या अनुभवांचे हे चित्रण. ८ वे यशस्वी पलायन केल्यानंतर त्याने हे पुस्तक लिहिले. जगातील सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या पुस्तकाची स्तुती केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Shreeram Book Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":47887167946841,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Papillon-marathi-book.jpg?v=1794928256"},{"product_id":"bermuda-triangle-by-vijay-deodhar","title":"बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e चार्लस् बर्लिझ (Charles Berlitz)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTranslator : विजय देवधर (Vijay Deodhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 255\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९४५ सालापासून ह्या सैतानी सागरप्रदेशात शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या ! एक हजाराहून अधिक माणसं गूढपणे बेपत्ता झाली ! मोठमोठ्या शोध-मोहिमा राबवूनही कशाचाच काहीही मागमूस लागला नाही.\u003cbr\u003eह्या विलक्षण घटनांमागे परग्रहावरील लोकांचा तर हात नसावा ना ?\u003cbr\u003eअथांग समुद्रगर्भातली आपल्याला अज्ञात अशी आणखी एखादी अतिप्रगत संस्कृती तर ह्या प्रकारांमागे नसेल ना? समुद्रगर्भात गडप झालेल्या, एके काळी भूपृष्ठावर अस्तित्वात असलेल्या 'अँटिलीस संस्कृती' चा तर ह्या घटनांशी काही संबंध नसेल ना?\u003cbr\u003eएक ना दोन, अशा विविध रहस्यमय गूढांची सविस्तर मीमांसा करणारे उत्कंठावर्धक, वाचनीय असे मराठीतील एकमेव पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Shreeram Book Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":47887183380569,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/The-Bermuda-Triangle-by-Vijay-Deodhar.jpg?v=1794928959"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/marathi-translated-books.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}