{"title":"ललित साहित्य","description":"\u003cp\u003eललित साहित्य (Lalit sahitya)\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"jagana-lihina-shwas-ghena-by-doris-dorrie","title":"जगणं... लिहिणं... श्वास घेणं... (Jagana Lihina Shwas Ghena)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e जगणं... लिहिणं... श्वास घेणं... (Jagana Lihina Shwas Ghena)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e डोरिस ड्योरी (Doris Dörrie)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : साकेत देखणे (Saket Dekhane)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 212\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडोरिस ड्योरीच्या मते अधिक उत्कटपणे जगण्याचा मार्ग म्हणजे लिहिणं. आणि लेखन म्हणजे स्तब्ध, शांत होणं, जाणीवपूर्वक आठवणी जागवणं आणि जग आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेणं. या पुस्तकाच्या माध्यमातून ही मोठी लेखिका दैनंदिन लेखनातून मिळणारा आनंद तिच्यासोबत वाटून घ्यायला आपल्याला आमंत्रित करते 'लाज, भीती, स्वतःबद्दलचा संदेह आणि शुद्धलेखनाचे नियम बासनात गुंडाळून ठेवायचे आणि पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहायला सुरुवात करायची.' डोरिस ड्योरी आपली लेखनवाटाड्या बनते आणि उत्कटपणे, नर्मविनोदी शैलीत व अतिशय प्रांजळपणे विविध विषयांना हात घालते बालपणीच्या आठवणी, अपरिचित ठिकाणं, हरवलेल्या वस्तू व गमावलेली माणसं, मैत्री आणि पछाडून टाकणाऱ्या गोष्टी. त्यामुळेच हे पुस्तक एका कुतूहलाने भरलेल्या, निर्भय आणि प्रेरणादायी स्त्रीचं व्यक्तिचित्र बनलं आहे. ती आपल्याला श्वास घेत राहायला, लिहित राहायला आणि काहीही झालं तरी आयुष्याला सामोरं जात राहायला बळ देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47867139293273,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Jagan-Lihina-Shwas-Ghena-01.jpg?v=1794672005"},{"product_id":"bhatakantee-by-hermann-hesse","title":"भटकंती (Bhatakantee)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e भटकंती (Bhatakantee)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e हेरमान हेसे (Hermann Hesse)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eTranslator : रेणुप्रसाद पत्की (Renuprasad Patki)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 120\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहेरमान हेसेच्या 'भटकंती' (मूळ जर्मन : Wanderung) या पुस्तकात त्याने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीची वर्णनं येतात. निसर्ग आणि काही प्रमाणात दैनंदिन मानवी जीवनातील घटकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या वर्णनांना मुक्तचिंतनाचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गदर्शनातून आत्मदर्शन हा या भटकंतीचा मूळ उद्देश आणि म्हणूनच या लेखांचे मुख्य सूत्र आहे, असं म्हणता येईल. हेसेला अपेक्षित असणारी भटकंती ही त्यामुळे तथाकथित अर्थाने भटकंती नाही, तसंच त्याला अपेक्षित असणारा भटक्या देखील तथाकथित भटक्यांपेक्षा वेगळा आहे. तो स्वतःच्या आणि जीवनार्थाच्या शोधात आहे. तो जीवनोत्सुक आहे, जीवनाच्या मूळ प्रक्रियेत त्याला रस आहे. आणि तो निसर्गनिरीक्षण आणि आत्मनिरीक्षण यांत भेद करत नाही. निसर्गाकडे परत जाण्याचा रस्ता हाच त्याच्यासाठी स्वतःपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. हेसेच्या या पुस्तकातील लेख वाचकाला निसर्गाची आणि निसर्गाच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची नव्याने ओळख करून देतील आणि अंतर्मुख करतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880128987225,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Bhatakantee.jpg?v=1794841276"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/lalit-sahitya.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}