{"title":"बेस्टसेलर | Bestseller","description":"\u003cp\u003eबेस्टसेलर | Bestseller\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"bhaykatha-d-p-khambete","title":"भयकथा (Bhaykatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e भयकथा (Bhaykatha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e द.पां. खांबेटे (D. P. Khambete)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 158\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eखांबेटे यांच्या भयकथांचे एक ठळक वैशिष्ट्य असे की केवळ भयकथा किंवा रहस्यकथा म्हणून त्यांची सरधोपट विल्हेवाट आपण लावू शकत नाही. कधी त्या कथांना विज्ञानाची जोड असते, कधी त्या आध्यात्मिक अनुभवांच्या अंगाने जातात, कधी त्यांना मानवी मनातल्या गूढ आणि अगम्य हालचालींची पार्श्वभूमी लाभते तर कधी निखळ विनोदाचा भयंकर अनुभूतीशी मजेदार गुणाकार होतो आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. या संग्रहातील काही कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतात. त्यामुळे तिथली भुतेखेते, समंध, खवीस, देवचार, मुंजे यांना त्या कथांत महत्त्वाचे स्थान लाभते. तिथला कधी सुंदर तर कधी भीषण असा निसर्गही कथेतल्या भीतीच्या छटा गडद करतो; पण हे सर्व असूनही या कथा मनात अंधश्रद्धा जागवत नाहीत किंवा तर्कविसंगत चमत्कारावरही भर देत नाहीत. त्यांचे त्यांचे म्हणून एक तर्कसंगत वास्तव या कथांत असतेच; आणि भयविस्मयातून हास्यनिर्मिती होते. - शांता शेळके (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47657828024409,"sku":null,"price":192.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Bhaykatha_marathi_book_by_D._P._Khambete_01.jpg?v=1794313191"},{"product_id":"katha-stree-guptaheranchya-niranjan-ghate","title":"कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e कथा स्त्री गुप्तहेरांच्या (Katha Stree Guptaheranchya)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eनिरंजन घाटे (Niranjan Ghate)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 258\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्त्रियांच्या पराक्रमाची वर्णनं फार प्राचीन काळापासून वाचायला मिळतात. चाणक्यानं स्त्री-गुप्तहेरांपासून चंद्रगुप्ताला सावध राहावयाचा खणखणीत इशारा दिलाच; पण विषकन्यांपासूनही वाचवलं. स्त्रीच्या मोहात पडलेल्या पुरुषाच्या तोंडून कोणतंही गुपित वदवून घेता येतं, म्हणून स्त्रियांचा फार पूर्वीपासून हेरगिरीसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. स्त्रिया फक्त हेरगिरीच करत आल्या आहेत असं नाही, तर त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूला पाणी पाजल्याची अनेक उदाहरणं दुसऱ्या महायुद्धात घडलेली आहेत. पुरुषांच्या पराक्रमावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, मात्र स्त्रियांच्या पराक्रमावर त्यामानानं कमी पुस्तकं लिहिली गेली. माताहारी ही स्त्री गुप्तहेर म्हणून गाजली खरी, पण दुसऱ्या महायुद्धानं अनेक माताहारींना जन्म दिला. ह्या पुस्तकामध्ये साहसवीरपराक्रमी अशा महिला आहेत; आणि स्त्री गुप्तहेरही आहेत. युद्ध जिंकायला त्यांनी हातभार लावला यात शंका नाही. स्त्रियांच्या पराक्रमाच्या या कथा वाचकांना आवडतील असा मला विश्वास वाटतो. - निरंजन घाटे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47685210931289,"sku":null,"price":262.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/katha-stree-guptaheranchya-niranjan-ghate-1.jpg?v=1793378173"},{"product_id":"sahasanchya-jagat-by-vijay-devdhar","title":"साहसांच्या जगात (Sahasanchya Jagat)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e साहसांच्या जगात (Sahasanchya Jagat)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 192\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहस करणे हे सर्वांच्या आवाक्यात नसले तरी साहस करणाऱ्यांबद्धल, त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक वाटते. त्यामुळेच साहसकथाही आवडतात. विजय देवधर यांनी देशोदेशीच्या सत्य घडलेल्या साहसकथा 'साहसांच्या जगात'मधून सांगितल्या आहे. संकटात सापडलेला माणूस किंवा समोर मृत्यू दिसत असताना जगण्याच्या ईर्ष्येने धैर्य एकवटून त्यातून बाहेर पडतो. असे थरारक प्रसंग या कथांमध्ये आले आहेत. किलर शार्कच्या जबड्यात अडकलेल्या पाणबुड्याचे धैर्य, पॅराशूटशिवाय १८ हजार फुटांवरून मारलेली उडी, जलप्रलयात काढलेले दिवस, हिमवादळातील कर्तव्यनिष्ठा, बर्फात अडकलेल्या वैमानिकांची कहाणी, अशा अनेक कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो. या सर्व गोष्टींतील साहसी क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47822550925401,"sku":null,"price":168.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Sahasanchya-Jagat-by-Vijay-Deodhar.jpg?v=1794409827"},{"product_id":"romharshak-shikarkatha-by-vijay-devdhar","title":"रोमहर्षक शिकारकथा (Romharshak Shikarkatha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e रोमहर्षक शिकारकथा (Romharshak Shikarkatha)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविजय देवधर (Vijay Devdhar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन (Chandrakala Prakashan)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 152\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवन्य प्राण्यांच्या शिकारी हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय! यात गे मल्डन, जिम काॅर्बेट, केनेथ अँडरसन या सुप्रसिद्ध शिकाऱ्यांनी सांगितलेले रोमहर्षक शिकार अनुभव आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47822572191833,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Romharshak-Shikarkatha-by-Vijay-Deodhar.jpg?v=1794410373"},{"product_id":"drashta-by-veena-gavankar","title":"द्रष्टा (Drashta)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e द्रष्टा (Drashta)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e वीणा गवाणकर\u003cspan\u003e (Veena Gavankar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e वॉल्डन पब्लिकेशन (Walden Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 209\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदिसणाऱ्या गोष्टी बघायला शिकवणारा... विवेकाची साथ कधीही न सोडणारा... साधेपणाचा निस्सीम पुरस्कर्ता... मानवतेच्या एकात्मतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उद्गाता... मृत्यूलाही सजग मनानं अनुभवणारा... निसर्गपूजक हेन्री डेव्हिड थोरो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Walden Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47860780466265,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/drashta-by-veena-gavankar-1.jpg?v=1794639564"},{"product_id":"parvati-by-samar","title":"पार्वती (Parvati)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : पार्वती (Parvati)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 214\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसतीची कथा आपल्याला ज्ञात आहेच. पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्वही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग 'पार्वती' लिहिण्यामागचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर लेखकाने प्रस्तावनेत सविस्तर दिलं आहे. थोडक्यात, वाचकांना पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेता यावा हा मुख्य हेतू आहे.\u003cbr\u003eपार्वतीच्या जन्मापासूनच ही कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880299348057,"sku":null,"price":232.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Parvati-by-Samar.jpg?v=1794893445"},{"product_id":"urmila-by-samar","title":"उर्मिला (Urmila)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : उर्मिला (Urmila)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 262\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमिथिलेतील बालपण, लक्ष्मणासोबत विवाह, आयोध्येच्या राजप्रासादातील पहिलं पाऊल, प्रपंचाची सुरुवात, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलक्ष्मणाचा वनवास आणि आयोध्येतील एकांतवास, लक्ष्मणासोबत  चौदा वर्षानंतर प्रपंचाची नवी सुरुवात,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन मुलांचा जन्म, चंद्रकांत आणि अंगदीया या नगरातील वृध्दापकाळ.... हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती? तिचं विचारविश्व कसं होतं? हे उलघडणारी कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880324513881,"sku":null,"price":312.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Urmila-by-Samar.jpg?v=1794893395"},{"product_id":"radha-by-samar","title":"राधा (Radha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name : राधा (Radha)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e समर (Samar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e समर पब्लिकेशन (Samar Publication)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चितन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. त्ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे 'कादंबरीमय उपनिषद !'\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":47880333819993,"sku":null,"price":232.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Radha-by-samar.jpg?v=1794893371"},{"product_id":"sattar-divas-by-ravindra-gujar","title":"सत्तर दिवस (Sattar Divas)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e सत्तर दिवस (Sattar Divas)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e रवींद्र गुर्जर (Ravindra Gujar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e श्रीराम बुक एजन्सी (Shreeram Book Agency)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 200\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१२ ऑक्टोबर, १९७२. युरुग्वे एअर फोर्सच्या 'फेअर चाइल्ड एफ् २२७' ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. रग्बी खेळाडूंचा हौशी संघ चिलीकडे निघाला होता. अँडीज पर्वत ओलांडून त्यांना यायचं होतं. अँडीज हा हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत-समूह. त्याची लांबी जगामध्ये सर्वांत जास्त. त्यावरून 'फेअर चाइल्ड' विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव चालूच होता. झंझावाती वाऱ्यानं विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले. दुपारी ३.३० वाजता वैमानिकानं सैंटियागो विमानतळावर 'सब ठीक'चा संदेश दिला. परंतु त्यानंतर एकाच मिनिटाने सैंटियागो टॉवरचा विमानाशी संपर्क तुटला. पुढचे आठ दिवस चिली, अर्जेटिना आणि युरुग्वेच्या लोकांनी विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. अँडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहिशी झाली. उतारूंपैकी कोणीही वाचण्याचा संभव तर अजिबात नव्हता. दहा आठवड्यानंतर एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अँडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसल्या. त्यांचं स्वरूप भयानक होतं आणि ते गुडघ्यांवर खुरडत होते. शेतकऱ्याला जवळ येण्यासाठी जोरजोराने खुणावत होते. भीतीमुळे त्यानं दुरूनच रुमालातून कागद-पेन त्यांचेकडे फेकलं. दाढी वाढलेल्या, भकास चेहेऱ्याचा आणि कपड्यांच्या चिंध्या झालेल्या त्या इसमानं काही तरी लिहून कागद परत फेकला. त्यावर लिहिलं होतं : 'पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे. मी युरुग्वेचा रहिवासी... त्या दुर्दैवी अपघातातून पंचेचाळीस जणापैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या सत्तर दिवसांची हृदयद्रावक सत्यकथा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shreeram Book Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":47887201337433,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Sattar-Diwas-marathi-book.jpg?v=1794929768"},{"product_id":"winston-churchil","title":"विन्स्टन चर्चिल (Winston Churchil)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e विन्स्टन चर्चिल (Winston Churchil)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e \u003cspan\u003eवि.ग. कानिटकर \u003c\/span\u003e(V.G. Kanitkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 480\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003eहिटलरच्या रुपाने थैमान घालणा-या नाझी भस्मासुरापुढे उभ्या ठाकलेल्या या महापुरुषासारखे व्यक्तिमत्व क्वचितच निर्माण होते. हा श्रेष्ट पुरुष इतिहास घडविणारे आयुष्यच जगला.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eज्या जीवनपद्धतीत विन्स्टन यांच्याबरोबर अॅटली यांच्यासारखा उदारमतवादी निर्माण होतो\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआणि ज्याचा भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय हा एकदा लोकशाही पद्धतीने मान्य झाल्यानंतर तो सबंध देशाचा निर्णय ठरतो\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्या लोकशाही जीवनपद्धतीच्या अस्तित्वासाठी हिटलरविरूद्ध एकाकीपणे झुंजणारा विन्स्टन चर्चिल हा एक महामानवच मानला गेला पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eभारताला स्वातंत्र्य प्रदान करण्याच्या पंतप्रधान अॅटली यांच्या निर्णयाला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eविन्स्टन यांनी कडाडून विरोध केला. आपण विरोध का करतो याची जी कारणे त्यांनी जाहीरपणे दिली ती खरी ठरली आहेत. याचा अर्थ इतकाच की विन्स्टन यांचा विरोध हा प्रामाणिक विरोध होता. चुकीचा वा बरोबर\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eकसला विरोधच ज्या राजवटीत संभवत नाही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यांनी या कारणाकरता विन्स्टन यांना इतिहासात बदनाम करणे हा ऐतिहासिक अपलाप होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891601981529,"sku":null,"price":560.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Winston-Churchil-By-V-G-Kanitkar.jpg?v=1794978525"},{"product_id":"samantar-by-suhas-shirvalkar","title":"समांतर (Samantar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBook Name :\u003c\/span\u003e समांतर (Samantar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAuthor :\u003c\/span\u003e सुहास शिरवळकर\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Suhas Shirvalkar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePublisher :\u003c\/span\u003e दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. (Dilipraj Prakashan Pvt. Ltd.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage : मराठी (Marathi)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePages : 196\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडायरीतलं प्रत्येक पान त्याचा उद्याचा दिवस कसा आहे ते सांगत असतं... पण शेवट मात्र अधांतरीच असतो… कारण तसंच ‘समांतर’ आयुष्य नशीबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय आधीच्याला मुक्ती नसते. काळ मात्र तसाच पुढे जाणार असतो, सतत कोणालातरी ‘समांतर’ आयुष्य जगायला लावत...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47897453887577,"sku":null,"price":256.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/Samantar-By-Suhas-Shirvalkar.jpg?v=1795018225"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/bestselling-marathi-books.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}