{"title":"आरोग्यविषयक पुस्तके","description":"\u003cp\u003eसाहित्यविश्वाच्या आरोग्यविषयक पुस्तकांच्या संग्रहात आपले स्वागत!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्य, निरोगी जीवनशैली आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य याविषयी माहिती देणारी पुस्तके येथे पाहा. आयुर्वेद, योग, प्राणायाम, ध्यान, आहारशास्त्र, व्यायाम, नैसर्गिक उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्याविषयी अधिक जाणून घ्या, चांगल्या जीवनशैलीसाठी उपयुक्त पुस्तके वाचा आणि ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्यदायी जीवनासाठी वाचनाची साथ — साहित्यविश्व!\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"badalti-jeevanshaili-ani-aajar","title":"बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e बदलती जीवनशैली आणि आजार (Badalti Jeevanshaili Ani Aajar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e डॉ. दिलीप देवधर (Dr. Dilip Devdhar)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबदलत्या जीवनमानानुसार आपला आहार बदलला आहे. व्यायामाचा अभाव, सुखवस्तू जीवन, व्यसन, मानसिक ताणतणाव वाढत आहेत. यामुळे 'जीवनशैलीमुले उद्भवणाऱ्या आजारांचे' प्रमाण सातत्याने वाढत आहे. ब्लडप्रेशर, डायबेटीस, हृदयविकार, संधिवात, स्पाँडेलेसिस, पचनाच्या तक्रारी मध्यमवयीन तक्रारी मध्यमवयीन व्यक्तींबरोबरच तरुणांमध्येही आहे. आधुनिक जीवनशैली आरोग्याची कशी हानी करीत आहे आणि टाळून आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे हे डॉ. दिलीप देवधर यांनी 'बदलती जीवनशैली आणि आजार 'मधून सांगितले आहे. बदलती जीवनशैली म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केले आहे. रक्तदाबाची व्याख्या, कार्य रक्तदाबात होणारे बदल, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारे धोके, तपासण्या, आहार, व्यायाम सांगितले आहे. त्याचप्रमाणे मधुमेह (डायबेटीस ), हृदयरोग, हाडांचे व सांध्यांचे आजार, पोटाचे विकार व पचनाच्या तक्रारी या आजारांविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. जीवनशैली व व्यसने, मानसिक ताण व मनोविकार, जीवनशैली व व्यायाम, जीवनशैली व आहार यांचे महत्त्वही सांगितले आहे. मेनोपॉज काळ, त्याची लक्षणे, त्याचा परिणाम, घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":47683982000217,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/badalti-jeevanshaili-ani-aajar-dr-dilip-devdhar-1.jpg?v=1793372502"},{"product_id":"वजन-फार-वाढतंय-vajan-phar-vadhatay","title":"वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे नाव :\u003c\/span\u003e वजन फार वाढतंय (Vajan Phar Vadhatay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक :\u003c\/span\u003e डॉ. विजया साठे (Dr. Vijaya Sathe)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशक :\u003c\/span\u003e चंद्रकला प्रकाशन \u003cspan\u003e(Chandrakala Prakashan)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजाची मेदवृद्धीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे. वजन अतिरेकी वाढणे हा विकार आहे. केवळ सौंदर्यमीमांसेचा प्रश्न नाही. रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाची अकार्यक्षमता, पाठीचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, आणि यांच्या जोडीला अनेक मानसिक व सामाजिक समस्या वाढत्या वजनाबरोबर येतात. या प्रश्नाविषयी पुस्तक लिहून डॉ. विजया साठे यांनी एक महत्त्वाचा विचार जनमानसात रुजविला आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sahityavishwa","offers":[{"title":"Default Title","offer_id":47713170128985,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0700\/5739\/4265\/files\/vajan-phar-vadhatay-1.jpg?v=1793637702"}],"url":"https:\/\/sahityavishwa.com\/collections\/arogya-vishayak-pustake.oembed","provider":"Sahityavishwa","version":"1.0","type":"link"}