Press "Enter" to skip to content

चेटकीण – नारायण धारप

नमस्कार मित्रहो, मी तुम्हाला एका रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेल्या कादंबरी विषयी सांगणार आहे. रहस्यमय आणि गूढ लेखन म्हटलंं की त्यांचं नाव अव्वल स्थानी येते. माझ्या पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणाने त्यांनी एक काळ गाजवला होता.

मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पिढीला सुद्धा त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल. मी असं ऐकलं आहे, की मध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत नव्हती,  तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा.रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे  लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप सर.

माझ्या पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणाने त्यांनी एक काळ गाजवला होता. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पिढीला सुद्धा त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल. मी असं ऐकलं आहे, की मध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत नव्हती,  तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा.रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे  लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप सर.

नारायण धारप सर यांची अशाच रहस्यमय आणि गूढ कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे चेटकीण. या कादंबरीची पहिली आवृत्ती २००२ मध्ये प्रकाशित झाली आणि त्यानंतर या कादंबरीने वाचकांना अक्षरश: वेड लावले. कादंबरीच्या मुखपृष्ठावर लाल अक्षरामध्ये ‘चेटकीण’ लिहिल आहे. एक खिडकी आहे आणि त्या खिडकी मधून एक जुने घर दिसते. कादंबरीचे मुखपृष्ठ  संतुक गोळेगावकर यांनी साकारलेले आहे.

एकदा वाचायला सुरुवात केली, की ती हातातुन सोडवत नाही. मी तर ही कादंबरी एका रात्रीत वाचून काढली आहे. मनाला आदिम उत्कंठा लावणारी अशी ही कादंबरी.

कादंबरीची सुरुवात होते ती कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतामध्ये परत येते. सोनालीच्या आजीच्या मृत्यू नंतर पुढच्या विधींंसाठी दांडेकर कुटुंबीय त्यांच्या वाडीवर जातात. दांडेकरांचीवाडी गजबजलेल्या वस्ती पासून अगदी दूर त्या दोन वस्तूंंना घेऊन एका कोपऱ्यात असल्या सारखी. खूप वर्षांनी सोनाली अमेरिके वरून परत आलेली आणि वाडीवर तर ती पहिल्यांदाच आलेली.

वाडीवरच्या आजूबाजूच्या परिसराविषयी तिला ओढ निर्माण होते. तिला जास्त कुतूहल आणि उत्कंठा वाटते, ती त्या बंद वास्तू विषयी. त्या ओढीमुळेच ती वाडीचा आणि त्या बंद वास्तूचा इतिहास जाणून घेते. त्या वास्तू मध्ये एक पिशाच्च शक्ती बंद आहे. काही लोक त्या शक्तीचे शिकार होतात, तर काही त्या शक्ती पासून अगदी सुखरुप परत येतात.

मानवाला काही गोष्टी, म्हणजे काही आजार, काही सवयी त्याच्या अनुवंशिकतेमुळे मिळतात. या गोष्टींंमध्ये त्याच अनुवंशिक गुणधर्माने सोनालीला त्या बंद वास्तूमधील पिशाच्च शक्ती दिसत असते. चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित, गूढतेची एखाद्या भयपटात शोभावी अशी ही गोष्ट.

लेखकाने इतक्या उत्तम प्रकारे मांडली आहे, की कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून धरते. हीच तर नारायण धारप यांच्या लेखनाची  खासियत आहे, जी वाचकाला अक्षरशः वेड लावते.

श्रीजीवन तोंदले, कोल्हापूर

लेखक : डॉ. अमित करकरे 
पृष्ठसंख्या : २०८
किंमत : रु.२२५/- 
प्रकाशक : साकेत प्रकाशन

चेटकीण हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा.

Secured By miniOrange