Press "Enter" to skip to content

‘साहित्यविश्व’विषयी

‘साहित्य’ या विषयाशी संबधित सर्व घटकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर साहित्याशी संबधित सर्व घटकांचे व साहित्यप्रेमींचे मनापासून स्वागत आहे. ‘साहित्यविश्व’ हे लेखकांपासून वाचकांपर्यंत, प्रकाशकांपासून वितरकांपर्यंत तसेच साहित्य क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हक्काचे व्यासपीठ आहे.

मराठी साहित्य विश्वाचा पसारा खूप मोठा आहे; आणि पुढंही हा प्रवाह असाच रुंदावत जाणार आहे. या विश्वातीला ऐतिहासिक घटनांचा आढावा घेण्याचा आमचा मानस आहे.

मूलभूत उद्दिष्टे

  • मराठी साहित्य क्षेत्रात निर्मिती झालेल्या दर्जेदार मराठी साहित्याला घराघरात व जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोचविणे.
  • वाचन संस्कृती वाढण्यासाठी, प्रत्येकाला वाचनाची गोडी लागण्यासाठी विविध उपक्रमांंतून वाचनासाठी प्रेरित करणे.
  • दर्जेदार साहित्य ‘पुस्तक ओळख’ व ‘पुस्तक परीक्षण’ या सदरांंच्या माध्यमातून जास्तीत- जास्त वाचकांपर्यंत पोचविणे.
  • रसिक वाचकांचे प्रबोधन, मराठी साहित्याचा व वाचनसंस्कृतीचा प्रसार करणे.
  • विविध पुस्तके वाचून साहित्यप्रेमींचे जे मत आहे ते ‘वाचकांचे मत’ या सदराच्या माध्यमातून लेखकांपर्यंत व प्रकाशकांनपर्यंत तसेच इतर वाचकांपर्यंत पोचविणे.
  • साहित्य क्षेत्रात घडणाऱ्या घटना व कार्यक्रम यांंची माहिती साहित्यक्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत पोचविणे.
  • साहित्य निर्माते (प्रकाशक , लेखक) व विक्रेते यांच्या कडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनांची व विविध उपक्रमाची माहिती पोचविणे.

तसेच मराठी साहित्य क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी, सामाजिक पातळीवर साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणे. ही साहित्यविश्वची मुलभूत उद्दिष्टे आहे.

Secured By miniOrange